तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

पाणी टंचाई निवारणार्थ 30 विंधन विहीरी मंजूर


26 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी घेणार विहीरी

बुलडाणा, दि‍.22

- पाणीटंचाई निवारणार्थ  सिंदखेड राजा व बुलडाणा तालुक्यातील एकूण 26 गावांमध्ये विंधन विहीरी घेण्यास मंजूरात देण्यात येत आहे. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

   सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु, चांगेफळ, साठेगांव, बोराखेडी गंडे, पिंपरखेड बु, केशवशिवणी, वाकद जहाँगीर, खैरव, पिंपळगांव सोनारा, गुंज, दरेगांव, महारखेड,  राजेगांव, सायाळा, पांग्री काटे, मलकापूर पांग्रा या गावांसाठी एक विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे, तर  शेंदुर्जन,  साखरखेर्डा गावांसाठी दोन विंधन विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा तालुक्यातील शिरपूर, पांगरी, भडगांव, चिखला, नागझरी खु, आमसरी या गावांसाठी एक विंधन विहीर आणि रायपूर गावासाठी 2 विंधन विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

    - - - - - - - - - - - - - - - - -                                       

कोविड-१९ ला प्रतिबंध करण्‍यासाठी

माहिती आणि‍ प्रसारण मंत्रालयाच्‍या प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोतर्फे पुढाकार

·         ऑनलाईन डिजीटल प्रचार सामुग्री तयार केली

·         फिरत्‍या ऑडियो अनाऊन्‍समेंट द्वारे ग्रामीण भागातून प्रचार अभियान

·         लॉकडाऊनच्‍या काळात शासनाच्‍या विविध योजनाबाबत जनतेच्‍या प्रतिक्रीया जाणून घेण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न

बुलडाणा, दि‍.22 (जिमाका) - कोविड-१९ या साथरोगाच्या विविध मुदयाबाबत जनजागृती होण्‍यासाठी माहिती आणि‍ प्रसारण मंत्रालयाच्‍या महाराष्‍ट्र आणि गोवा विभागाच्‍या प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोतर्फेविविध डिजीटल प्रचार साधनांची निर्मिती करण्‍यात येत आहे. यामध्‍ये वैयक्‍त‍िक स्‍वच्‍छता राखणे, लॉकडाऊनच्‍या काळात घरामध्‍येच राहणे, सार्वजनिक ठिकाणी योग्‍य सामाजिक अंतर (सोशल डिस्‍टन्सिंग) पाळणे, शासनाच्‍या विविध सूचना व आदेश पाळणे, आरोग्‍य सेतु अॅप डाऊनलोड करणे, लॉकडाऊनमध्‍ये सुरु असलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवांची यादी देणे, शारीरिक व मानसिक आरोग्‍य टिकवणे आणि अफवांना आळा बसवणे यांवर भर देण्‍यात येत आहे. ही सर्व प्रचार साधने प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोच्‍या सोशल मिडीयांवर तसेच विभागाच्‍या सर्व कर्मचा-यांच्‍या वैयक्‍त‍िक संपर्क माध्‍यमांवर अपलोड करण्‍यात येत आहे. हे सर्व संदेश व्‍हॉटसअॅपच्‍या माध्‍यमातून दररोज जवळजवळ १३००० लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.

फिरत्‍या ऑडियो अनाऊन्‍समेंटद्वारे जनजागृती अभियान

प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोच्‍यावतीने ध्‍वनीमुद्रि‍त गीते व संदेशाद्वारे फिरत्‍या ऑटोरिक्‍शा, टेम्‍पोमधून ऑडियो अनाऊन्‍समेंट सिस्‍टीमने जनजागृती अभियान राबविले. यामध्‍ये प्रामुख्‍याने कोविड-१९ चा प्रसार रोखण्‍यासाठी विविध प्रतिबंधात्‍मक उपायांवर गीत व संदेशाद्वारे जनजागृती केली.  हे अभियान बुलडाणा जिल्‍हयातही राबविण्‍यात आले. दिनांक ७ ते १४ एप्रिल दरम्‍यान या अभियानात एकुण २३ ऑटोरिक्‍शा/टेम्‍पो वरील १६ जिल्‍हयात सुमारे ७००० कि.मी अंतर कापून प्रचार करण्‍यात आला.

जनतेच्या सूचना व प्रतिक्रीया शासनास सादर

      लॉकडाऊनच्‍या काळात जनतेसाठी विविध सुविधा व लाभ शासनामार्फत जाहीर करण्‍यात आले. प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरो मार्फत सामान्‍य जनतेच्‍या सूचना व प्रतिक्र‍िया शासनास सादर करणे हे कार्य ही करते. या अभियानात ब्‍युरोमार्फत लॉकडाऊनच्‍या काळात ग्रामीण जनतेच्‍या हिताच्‍या शासनाच्‍या विविध योजनांविषयीच्‍या प्रतिक्र‍िया शासनास कळविण्‍यात आल्‍या. ब्‍युरो कोविड-19 बाबत केवळ शासनाच्‍या विविध योजनांचा प्रचार करीत नाही तर शासन व जनता यांच्‍यातील दुवा म्‍हणून सुध्‍दा काम करीत आहे. सुप्रिम कोर्टाच्‍या आदेशाने अफवा/चुकीची माहितीचा प्रसार रोखण्‍यासाठी भारत सरकारच्‍या प्रेस इन्‍फर्मेशन ब्‍युरो मध्‍ये स्‍थापन केलेल्‍या वस्‍तुस्थिती पडताळणी समिती प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरो सहाय करीत आहे. यासाठी जिल्‍हा प्रशासनाशी समन्‍वय साधण्‍यात येत आहे.

No comments:

Post a comment