तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाघबेट येथे 300 गोरगरीब नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप ; सरपंच अमरनाथ गित्ते यांची गरीबांना साथ, लाॅकडाऊनमध्ये गरजुंना मदतीचा हात


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन काळात गोरगरीबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाघबेट येथील 300 गोरगरीब नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अमरनाथ गित्ते यांनी गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तू वाटप केल्यामुळे गरीबांना आधार देन्याचा प्रयत्न केल्याने परिसरात त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
      देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. काही जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एक उपाय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे.त्यामुळे हातावरचे पोट असणार्‍या मजुरांना जगणे मुश्कील झाले आहे.हाताला काम नाही त्यामुळे मिळकत कुठुन अशात कुटुंबांचा ऊदरनीर्वाह तरी कसा करायचा असा एक प्रश्न गरीबांसमोर ऊभा झाल्याने  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते वाल्मिक (अण्णा) कराड यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अमरनाथ गित्ते यांनी गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तुचे वितरण करुन गरीबांना आधार दिला आहे. 300 जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गव्हु, तांदूळ, तुर दाळ, साखर, गोडतेल, चना, मीठ पुडा, मिरची व हळद पावडर, साबण आदी देण्यात आले आहे. 15 दिवस पुरेल एवढे साहित्य देण्यात आले आहे. वाघबेट येथील 300 गोरगरीब कुटुंबांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक समाजाचा मार्गदर्शक म्हणून आपली नैतिक जबाबदारी समजून सरपंच अमरनाथ गित्ते सामाजिक बांधिलकी जोपासत धान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच सरपंच यांनी गावातील विविध भागात निर्जंतुकीकरण करत औषध फवारणी केली आहे. गावात ते दररोज करोनाचे अपडेट गावकऱ्यांना देऊन जनजागृती करीत आहेत. सरपंच यांनी माणुसकीचे दर्शन घडवत मास्क, सेनिटरायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे. गरजवंत गोरगरीब जनतेस नेहमीच मदतीला धावून येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती सरपंच अमरनाथ गित्ते यांनी संकटकाळी मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपत संकटसमयी धावून आले आहेत. तसेच  ग्रामस्थांनी कोरोनाच्या लढाईत घरीच रहा, घरा बाहेर पडून नका, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment