तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

मालेगाव शिरपूर जऊळका पोलीस स्टेशनला गोपाल पाटील राऊत यांच्या तर्फे 300 मास्क वाटप

वाशिम/मालेगाव (फुलचंद भगत)-14 एप्रिल कोरोणा या विषाणूने देशात कहर घातला असताना आपल्या जिवाची पर्वा न करता पोलीस बांधव प्रयत्नाची पराकाष्टा करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान करत असताना त्यांना आपली ड्युटी चौक बजावावी लागत,आहे म्हणून 
गोपाल पाटील राऊत यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून मालेगाव तालुक्यातील  जऊळका येथे ठाणेदार जाधवर साहेब यांना सरपंच सुनील पाटील राऊत यांच्या हस्ते 100 मास्क सुपूर्द करण्यात आले त्यानंतर मालेगाव येथे ठाणेदार आधार सिंग सोनोने यांना शंभर मास्क सुपूर्त करण्यात आले यावेळी नितीन पाटील काळे यांची उपस्थिती होती त्यानंतर शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे साहेब यांना सुद्धा शंभर मास्क सुपूर्त करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहम्मद इमदाद माजी पंचायत समिती सदस्य पंकज देशमुख पत्रकार शंकर भाऊ वाघ  यांची उपस्थिती होती गोपाल पाटील राऊत यांची जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून समाजातील सर्व घटकांना मदत झाली पाहिजे आणि खारीचा वाटा म्हणून ते त्यांच्या परीने करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अजूनही जिथे आवश्यकता पडेल तिथे सेवा करण्याचं काम करू असा मनोगत गोपाल पाटील राऊत यांनी व्यक्त केला आहे मालेगाव तालुक्यातील शिरपूर जऊळका मालेगाव या पोलिस स्टेशनला प्रत्येकी 100 मास्क दिल्यामुळे गोपाल पाटील राऊत यांचे ठाणेदार यांनी आभार मानले.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

No comments:

Post a comment