तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

परळीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर आयोजित निबंध स्पर्धा ; 30 एप्रिल पर्यंत निबंध पाठवावून स्पर्धेत सहभागी व्हा- अनंत ढोपरे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.   निबंध पाठवावेत तसेच परळीतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनींनी मोठ्या संख्येने निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष अनंत ढोपरे यांनी केले आहे.
       देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लाँकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे पर्यंतचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच  दरम्यानच्या काळात वाचन व लेखन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांनसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निंबध स्पर्धेचे आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व परळी  नगरपरिषद माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मा.बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या आदेशावरून व राष्ट्रवादी काँग्रेस शहर सरचिटणीस अनंतराव इंगळे व पाणीपुरवठा सभापतीश्रीकृष्ण (भाऊड्या) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निंबध स्पर्धेत विषय: १. छत्रपती शिवराय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर २.विद्यार्थी दशेतील अनुभव ३.कॉरोना महामारी व आपण या विषयावर निबंध हस्तलिखित करून निबंध स्पर्धेत प्रवेश घेऊन अंतिम तारीख  निबंध पाठवण्याची अंतिम दि. 30 एप्रिल 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत  पाठवावेत. यामध्ये उत्कृष्टपणे लिखाण करणाऱ्या निबंधास प्रथम बक्षीस रोख-3,000/- व प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस रोख-2000/- व प्रमाणपत्र तृतीय बक्षीस  रोख-1000/- व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी सर्व सहभागी स्पर्धकांनी निबंध पेपर वर लिहून अनंत गणेशराव ढोपरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस 9551258555 या मोबाईल क्रमांकावर स्वच्छ हस्ताक्षरात फोटो काढून व्हाट्स अप मोबाईलवर पाठवावेत.  ज्यांना बक्षीस मिळेल त्यांचे निबंध सर्व स्पर्धकांना व्हाट्स अप मोबाईल  केले जातील. निबंध स्पर्धा संबधी अधिक माहिती साठी संपर्क  संकेत दहिवाडे- 8329142520,आकाश डोंगरे-9970777677 ऋषिकेश राऊत-9028622282,नरेश वाळके-9853421717, विशाल चव्हाण-8411804451,निसर्ग जमशेट्टे7767949992,हर्षवर्धन वानखेडे-9657576884,प्रथमेश वावदाने-7719123187 यांच्याशी साधावा . तसेच  हा उपक्रम राबविण्याचा उद्देश असा आहे की परिवारासोबत घरी बसून आपली अभ्यासूवर्ती दिसून येईल व कुटुंब एकत्रित येऊन वरील विषयांवर चर्चा होईल. ही निबंध स्पर्धा परळी शहर आणि ग्रामीण भागातील परिवारासाठी राहील. परळी शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्तविद्यार्थी- विद्यार्थ्यांनींनी मोठ्या संख्येने निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनंत ढोपरे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment