तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

जागृती पतसंस्था व मल्टीस्टेटच्या वतिने मुख्यमंत्री निधीस 31 हजार रूपये जागृती प्रतिष्ठाणच्या वतिने 200 गरजूंना अन्नधान्य वितरित
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असून या कालावधीत गरजु कुटुंबियांना अन्नधान्यासाठी मदत म्हणून जागृती प्रतिष्ठाणच्या वतिने 200 कुटूंबियांना एक महिनाभराचे अन्नधान्य देण्यात आले. चेअरमन प्रा.गंगाधर शेळके व संचालक मंडळाने याचे नुकतेच वाटप केले आहे. तसेच जागृती पतसंस्था व मल्टीस्टेटच्या वतिने कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रूपये 31 हजाराची मदत आज देण्यात आली. तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांच्याकडे आज हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.  
परळी येथील जागृती प्रतिष्ठाणच्या वतिने शहरातील 200 गरीब कुटूंबियंाना 5 किलो गहु, 5 किलो तांदुळ, साखर, तुरदाळ, मीठ व चहा पावडर असे एका महिन्याचे अन्नधान्य वितरित करण्यात आले. जागृती प्रतिष्ठाणने विशेष मोहिमेतून हे अन्नधान्य केले आहे. जागृती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.गंगाधर शेळके सर, उपाध्यक्षा सौ.शोभाताई शेळके, संचालक  सुभाष नानेगर, लक्ष्मण चव्हाण, वसंत सुर्यवंशी, जागृती प्रतिष्ठानचे सचिव प्रल्हाद सावंत, सहसचिव गोविंद भरबडे, जागृती प्रतिष्ठानचे सदस्य हेमंत कुलकर्णी,  व जागृती ग्रुपचे कर्मचारी आदी मान्यवरांच्या हस्ते  गरजु , महिला व नागरीकांना  रेशन व किराणा सामानाचे वाटप  करण्यात आले. या उपक्रमास जागृती पतसंस्था व मल्टीस्टेटचे सर्व सभासद, ठेविदार व हितचिंतकांनी मोलाचे सहकार्य केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 31 हजार रूपये
जागृती पतसंस्था व मल्टीस्टेटच्या वतिने कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रूपये 31 हजाराची मदत आज देण्यात आली. तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांच्याकडे आज हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक प्रल्हाद सावंत व गोविंद भरबडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment