तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

पालम पोलिसानी 33 वाहने केली जप्तअरुणा शर्मा


पालम :- देशात व राज्यात कोरोना विषाणूचे संसर्ग बाधित रूग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे व या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशान्वये जिल्हात 24 मार्च पासून संचार बंदी (कलम 144) लागु करूण नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते पालम पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावामध्ये संचार बंदी लागु आसतांना व जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला न जूमानता अत्यावश्यक सेवेचे कुठलेही काम नसताना उपद्रवी लोक जाणीवपुर्वक खोटे बहाने करून रस्त्यावर मोटर सायकल घेउन फिरत असतात त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने पालम पोलीसानी एकुण 33 वाहने (मोटर सायकल) जप्त करण्यात आल्या आहेत हि कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी किर्डीले पुर्णा यांच्या मार्ग दर्शनाखाली सा.पो.निरक्षक सुनिल माने, ए.पि.आय. सचिन इगेवाड, फोजदार विनोद साने, जमादार सुधाकर मुंडे यांनी केली आहे तसेच जप्त केलेली वाहणे हे पुढील लॉक डॉऊन संपल्यानंतर वाहणाचे कागदपत्रे पाहुन व खात्री करून सोडण्यात येतील याची नोंद घ्यावी असी माहीती पोलिस स्टेशन यांनी दिली.

No comments:

Post a comment