तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शेतकरीही सरसावले ; दादाहारी वडगाव येथील शेतकरी सुभाष बाबुराव आढाव यांनी दिला 3 हजार रुपयांचा मदत निधीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्वत्र मदत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदत देण्याचे आवाहन शासकीय पातळीवरून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव येथील शेतकरी सुभाष बाबुराव आढाव यांनी 3 हजार रुपये यांचा धनादेश नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तलाठी विष्णू गित्ते यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आता शेतकरी सरसावले आहेत. 
       देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लाँकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव येथील शेतकरी अल्पभूधारक सुभाष बाबुराव आढाव  यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ साठी तीन हजार रूपयांची मदत खात्यात जमा केली आहे.  कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहेत. या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. आता यामध्ये शेतकरी ही सरसावले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी आहे. आज संपूर्ण देश एकजुटीने कोरोना विरुद्ध लढत आहे. आपणही या लढ्यात खारीचा वाटा उचलून योगदान देऊ शकतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a comment