तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व कृषीच्या विषयावर अखिल भारतीय काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले व समन्वय बाबुराव मुंडे व 40 प्रतिनिधी यांनी व्हडिओ काँन्फरन्सव्दारे साधला संवाद


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जगात कोरोना व्हायरसमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातच दिवसेंदिवस. कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. कोरोना विषाणू व कृषीच्या व विविध विषयांवर देशाचे अखिल भारतीय किसान काँग्रेस सेलच्या सर्व पदाधिकारी यांच्याशी व्हडिओ काँन्फरन्सव्दारे दि.21 एप्रिल रोजी आढावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ना.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेंद्र सोळंके, राष्ट्रीय समन्वय तथा ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे व इतर 40 प्रतिनिधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला आणि  कोरोना व कृषी क्षेत्राचा आढावा घेतला.
      जगभरासह देशात व राज्यात एकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  सेलचे पटोले यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा, शेतकरी यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये,
 कृषी क्षेत्रातील  शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच आदींबाबत आढावा घेतला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.नाना पटोले, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेंद्र सोळंके, राष्ट्रीय समन्वय तथा ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे व अखिल भारतीय किसान सेलचे देशातील सर्व 40.प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सवर उपस्थित होत्या.
          कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर कृषी क्षेत्रात काही अंशी अडचणी उद्भवल्या होत्या. काही ठिकाणी शेतकऱ्यांना माल बाजार पेठेत आणता येत नव्हता आता सुरळीत चालू झाले होते. तथापि, लॉकडाऊनमुळे हे शेतकऱ्यांना वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.  सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे मालाची उचल तसेच वाहतूक त्वरीत होईल या अनुषंगाने सुचना दिल्या आहेत. देशातील सर्व कृषी कामे सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. दिवसागणिक देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून देशभरात लॉकडाऊन, संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. तसेच देशातील जवळपास सर्वच सफरचंद, द्राक्षे,चिकू,संञी,मोसंबी, केळी,टरबूज,खरबुज, आंबा,पपई,किवी,ड्रॅगन फ्रुट,अननस,स्ट्रॉबेरी,अंजीर तसेच  कांदा, लसूण,वांगे,कारले,बटाटा, मेथी,शेपू,वाटाणा,सिमला मिरची,अद्रक,दोडका,गवार, शेवगा शेंग,बीट,लिंबू, काकडी,चवळी या पालेभाज्या व विविध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या माला मार्केट मिळत नसल्याने शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ येऊन,अनेकांनी यावर नांगर फिरवलेल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉक डॉऊन मुळे गोरगरीब जनतेला उपासमारीची वेळ आलेली असून यामुळे अनेक लोक संकटात सापडले आहेत. त्यांना मदत करणे, खरीप हंगामासाठी विविध विभागाच्या माध्यमातून करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. तसेच खरिप हंगाम 2020 च्या अनुषंगाने पिक कर्ज वाटपास मंजुरी द्यावी. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांना टार्गेट देऊन पूर्ण कर्ज वाटप करण्याच्या व राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज प्रस्ताव घेण्याची सूचना जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात याव्यात, शासनामार्फत चालू करण्यात आलेली तूर व हरभरा केंद्र ग्रेडर नसल्याने बंद आहेत. ग्रेडर उपलब्ध करून सुरू करावीत, खर्च आणि उत्पादनाचा मेळ बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना सर्वातोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व गोष्टी संदर्भात आढावा घेण्यात आला. 
    कोरोना संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आला. कोरोनाचे विषाणूचे संकट म्हणजे सेवेसाठी आपल्याला मिळालेली एक संधी आहे त्यामुळे शांतता, सलोखा कायम राखत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी  सर्व आदेशांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. खबरदारी घ्या, दक्ष राहा आपल्या सतर्कतेमुळे कोरोनाचा शिरकाव रोखू शकतो,  तसेच संचारबंदी चे व जमावबंदीचे पालन करावे हे करत असताना शहरातील गावातील वृद्ध, गरोदर स्त्रिया , बालके , विविध आजाराने पीडित लोकांची काळजी घ्यावी , त्यांना घराबाहेर पडू देऊ नका, चला सारे मिळून कोरोनाला हरवू या!, प्रशासन तुमच्यासाठी,गरज तुमच्या साथीची, घरात रहा...सुरक्षित रहा...आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन बाबुराव मुंडे यांनी केले आहे. कोरोनाच्या विविध विषयांवर व कृषी विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला व आढावा घेतला.

No comments:

Post a comment