तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

मालेवाडी सरपंच सौ.वैशाली बदने प्रयत्नांना यश मिळवत, मालेवाडी तांड्यावरील वर्धा जिल्ह्यातील 44 ऊसतोड मजूर स्वगृही ; खबरदारी म्हणून होम क्वांटाईन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे मालेवाडी येथील वर्धा जिल्ह्यात ऊसतोडणी मजूर लाकडाऊश मुळे अडकले होते. ते मजूर आज मालेवाडी येथे दाखल झाले असून त्यांना तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी करून त्यांना 14 दिवसासाठी होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. दरम्यान ऊसतोड मजूरांना घरवापसी आणण्यासाठी मालेवाडीच्या सरपंच सौ.वैशाली बदने यांनी निवेदन दिले होते. त्यांच्या अखेर प्रयत्नला अखेर यश मिळाले आहे.  ऊसतोड मजुर आभार व्यक्त केले आहेत.
          देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन सुरु आहे. राज्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. या कोरोना विषाणूच्या महामारीत परळी तालुक्यातील मालेवाडी तांड्यावरील अनेक ऊसतोड कामगार अडकले आहेत. ऊसतोड कामगार परराज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अडकलेल्या जिल्हावासियांना व ग्रामस्थाना आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी सरपंच सौ.वैशाली भुराज बदने यांनी परळीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. याची दखल घेऊन मालेवाडी येथील 44 ऊसतोड मजूर स्वगृही आले आहेत. त्यांची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली, त्यांच्यात कोरोना ची कुठलीही लक्षणे आढळून आले नाहीत असे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून  त्यांना 14 दिवसासाठी होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. ऊस तोड कामगार हे वर्धा जिल्ह्यातील साखर कारखान्यास ऊसतोडीसाठी गेले होते . राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते परळी ला परत आले आहेत. सर्वांच्या तपासणी डॉ. मुंडे यांनी केली आहे.  यावेळी सरपंच वैशाली बदने, भुराज बदने, ग्रामसेवक काकडे, सदस्य सोमनाथ पोटभरे,.संजय राठोड आदी उपस्थित होते. 
       कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 
केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन  जाहीर केले आहे. यामुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार तामिळनाडू येथे ऊसतोडणी करण्यासाठी गेले असता ते तेथे अडकले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने परळीत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे मालेवाडी येथील 44 ऊसतोड मजूर स्वगृही परत आले आहेत. ऊसतोड कामगारांना  होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे कुठेलेही काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्यात कोरोना ची कुठलीही लक्षणे आढळून आले नाहीत असे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून  त्यांना 14 दिवसासाठी होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. सरपंच सौ.वैशाली बदने यांनी ऊसतोडणी मजूरांना घरवापसी आणण्यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. त्यांचे ऊसतोडणी मजूरांनी आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a comment