तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

दिव्यांगाना पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी 5 टक्के स्वनिधीतून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा


सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी


वाशिम(फुलचंद भगत)-सध्या कोरोनामुळे सर्वञ लाॅकडाऊन असल्यामुळे सर्वांचेच आर्थीक गणीत कोलमडले आहे तसेच हातावर पोट असणारांचीही ऊपासमार होत आहे.या परिस्थितीमध्ये दिव्यांगांना वार्‍यावर सोडुन चालणार नाही म्हणून शासनाने दिव्यांगांना ५ टक्के निधीतुन पंचायत समिती आणी ग्रामपंचायतींनी जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे प्रसिध्दी पञकाव्दारे केली आहे.
       कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा केलेली आहे. सदर संचारबंदीच्या काळामध्ये दिव्यांग व्यक्ति त्यांच्या मुलभूत गरजांपासून वंचित राहू नये तसेच प्रत्येक गरजू दिव्यांग व्यक्तिपर्यंत शासनामार्फत पुरविली जाणारी मदत पोहचली जावी, दिव्यांग व्यक्तिंना त्यांच्या शारिरीक संवेदनाक्षम आणि संवेदनशील मर्यादामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या दिव्यांगत्वानुसार विशिष्ट आवश्यकता, दिनचर्या समजून घेणे ही आवश्यक आहे. तसेच अशा परिस्थितीत त्यांचे संरक्षण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योग्य आणि वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्यानुसार दिव्यांग व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूअभावी उपासमार होणार नाही व भूकबळी होणार नाही याकरीता पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या 5 टक्के निधीतून निराधार/ निराश्रित व दिव्यांग व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूसाठी विना अट निर्वाह भत्ता देणे व दिव्यांग व्यक्तिंच्या पालकांना जीवनावश्यक वस्तूसाठी सर्व सहाय्य देणे बाबत सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यांनी सूचित करावे  तथा वाशिम जिल्हा क्षेत्रातील दिव्यांग व्यक्ति व वयोवृध्द नागरिक यांना घरपोच जीवनावश्यक वस्तू उपलब्ध् करुन देण्यासाठी प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशीही मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.प्रशासन नक्कीच या बाबीचा गंभीरतापुर्वक विचार करुन दिव्यांग आणी वृध्दांना दिलासा देईल अशी आशाही जिल्हावाशी व्यक्त करत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a Comment