तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते कुरुंदा येथे 500 गरजूंना धान्यकिट वाटप


------------------------------------------------
हिंगोली : कुरुंदा येथे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते 500 गरजू नागरिकांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली मतदार  संघाचे खासदार हेमंत पाटील सतत मदतीसाठी मतदार  संघाचा दौरा करत आहेत.जिल्ह्यात विविध संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या  कार्यक्रमांना उपस्थिती लावून गरजू लोकांना सॅनिटायझर, मास्क, धान्यकिट, कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस ,आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना द्राक्ष फळांचे चे वाटप करत आहेत.कुरुंदा येथे खासदार हेमंत पाटील ,उप कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी युनियनच्या वतीने 500 गरीब- गरजूंना धान्यकिट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते कुरुंदा येथील गरजूंना धान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, जगात सगळीकडे कोरोनाने हाहाकार उडाला असून सर्व सामान्य माणूस आपल्या गरजा कसरत करून पूर्ण करत आहेत पण ज्यालोकांच हातावर पोट आहे त्याच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होत आहे हीच बाब लक्षात घेऊन अनेक सेवाभावी संघटना आपआपल्या परीने मदत करत आहेत.त्याच अनुषंगाने कुरुंदा येथील व्यापारी युनियन  आणि उप कृषी उत्पन्न बाजार समितीने गरीब गरजूंना धान्य वाटप करण्याचे आयोजित करून खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थिती लावली गरजूंना धान्यकिट वाटप करून  मदतीचा हात देऊन कर्तव्य पूर्ण केले. वसमत नगराध्यक्ष पोरजवार, सभापती राजेश इंगोले, जिल्हा परिषद सदस्य राजेश चापके, पोलीस उपनिरीक्षक गोपिनवार, वैद्यकीय अधिकारी देवदत्त दळवी, उपसभापती रमेश दळवी, संभाजी सिद्धेवार, रवी कराळे, प्रकाश महाजन यांच्यासह आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment