तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

मुलांच्या वाढदिवस निमित्ताने खर्च टाळून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 50 हजार रुपयांची मदत ; महेश सराफ यांचा पुढाकारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्वत्र मदत पोचविण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये  आर्थिक मदत देण्याचे आवाहनाला प्रतिसादेत परभणी येथील सराफ कुटुंबियांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी  25 हजार रुपये पंतप्रधान सहायता निधीसाठी तर उर्वरित 25 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
              जगभरासह देशात व राज्यात एकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करून देशातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना करिता मोठा निधी जाहीर केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला 'पीएम केअर फंड' साठी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत प्रत्येक 25 रूपयांची एकुण 50 हजारांची पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये आर्थिक मदत जमा करण्यात आली. ही रक्कम रेणुका मंगल कार्यालय व रेणुका लॉन्सचे संचालक महेश प्रभाकरराव सराफ यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस चि.अमोघ यांचा वाढदिवस यावर्षी कोरोनाच्या संकटकाळी  वाढदिवस साजरा नाही करण्याचा निर्णय घेतला. खर्च टाळून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरफ कुटुंबीयांनी माणुसकीचे दर्शन घडवून सामाजिक बांधिलकी जपत हा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सोमवारी दि.20 मार्च रोजी सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत महेश सराफ, अमोघ सराफ , आदित्य सराफ, समीर सरदेशपांडे आदी उपस्थित होते.
      कोरोना विषाणुचा सध्या मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अतिशय प्रभावी प्रयत्न करीत आहेत. आपण संकटाला सामोरे जात असतांना अशी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे व सढळ हाताने मदत केली पाहिजे. परभणी येथील पाथरी रोड वरील प्रसिद्ध रेणुका मंगल कार्यालय व रेणुका लॉन्स चे संचालक महेश प्रभाकरराव सराफ यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस चि.अमोघ यांचा वाढदिवस यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला व तो सर्व खर्च कोरोनाग्रस्तांसाठी म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधी 25000₹ व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25000₹ अशा स्वरूपात एकूण 50 हजार रुपये अशा धनादेश दिला या कार्याचे लक्ष्मणराव रामदासी , मनोज रामदासी प्रशांत रामदासी व समस्त रामदासी परिवार यांनी अभिनंदन केले आहे. सराफ कुटुंब नेहमीच सामाजिक, शैक्षणिक कार्यात मदतम्हणून हातभार लावत असतात तसेच कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
            कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळकटी देण्यासाठीआहे. आज संपूर्ण देश एकजुटीने कोरोना विरुद्ध लढत आहे.आपणही या लढ्यात खारीचा वाटा उचलून योगदान देऊ शकतो. पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करावी, कोरोनाच्या संकटात नागरिकांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेला सुचना व आदेशाचे पालन करा. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनास सहकार्य करा, घरीच रहा, सुरक्षीत रहा, इतरांचीही काळजी घ्या असे आवाहन महेश सराफ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment