तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

आधी पॉझिटिव्ह असलेल्या 5 रुग्णांचे तिसरे रिपोर्ट निगेटिव्ह.।टाळ्यांच्या गजरात मिळाला डिस्चार्ज !

बुलडाणा: 20
वेळ दुपारी साधारणता 12 वाजताची, पण चेहऱ्यावर चिंता नव्हतीतर  ओसंडून वाहणारा आनंद होता. ते 5 जण मृत्यूवर मात करून ठणठणीत बरे झाले होते. त्यांना कोरोनाच्या विळख्यातून महत्प्रयासाने सोडविणल्याची भावना होती, जिल्हा आरोग्य यंत्रणेची. तर या कोरोना युद्धात जिल्हा प्रशासन बजावत असलेली भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता.

महिला सामान्य रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी बनविण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल पाच रुग्णांचे रिपोर्ट आता निगेटिव्ह आले असून त्यांना आज सोमवार 20 एप्रिल रोजी  डिस्चार्ज देण्यात आला, टाळ्यांच्या गजरात.

.. *बुलडाणा 1, चिखली 1, देऊळगावराजा 1, चितोडा ता. खामगांव 1 व शेगाव 1.. अश्या 5 रुग्णांना यावेळी डिस्चार्ज देण्यात आला.* विशेष म्हणजे बुलढाणा येथे मृत्यूनंतर ज्या रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार केलेला वार्डन नंतर कोरोना पॉझिटिव्ह आला होता, त्याचा दुसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता परंतु आज तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्या 23 वर्षीय युवकालाही आज डिस्चार्ज देण्यात आला. आता बुलढाण्यातील केवळ एक रुग्ण कोरोनाबाधित उरला असून तो आयसोलेशन वार्डात उपचार घेत आहे. त्याच्यासह आता त्या आयसोलेशन वार्डात 12 रुग्ण असून, एक रुग्ण विलगीकरण कक्षात आहे. आजच्या स्थितीत तपासणीसाठी पाठवून प्रलंबित असलेला एकही रिपोर्ट येणे बाकी नाही, तरी मलकापूरचे काही संशयित शोधून त्यांच्या चाचण्या होऊ शकतात.

ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांना निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी  सुमन चंद्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे व आरोग्य विभागाचा स्टॉफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

याआधी 3 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत, तर आता 5 रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या बुलढाणा जिल्ह्यात 8 एवढी झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या 21 रुग्णांपैकी एक आधीच मृत झालेला होता, तर आता एकूण 8 जण कोरोनातून बरे झाल्याने आता बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आली  आहे 12 वर.

No comments:

Post a comment