तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

आज 5 कोरोना बाधितांना डिस्चार्ज


_बुलडाण्याचा "त्या"ने ही हरविले कोरोनाला_

बुलडाणा:-20

 जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या कोरोना संसर्गिताच्या संपर्कातील शेवटचा तो युवकही आता निगेटिव्ह... यापूर्वी त्या मृतक संसर्गिताच्या आई, मुलगी आणि मुलाला निगेटिव्ह आल्यानंतर सुटी देण्यात आली होती पण त्या संसर्गितावर उपचार करतांना बाधित झालेला वॉर्डबॉय पहिल्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह होता म्हणून त्याचा डिसचार्ज होऊ शकला नाही परंतु नंतरच्या दोन्ही रिपोर्टमध्ये तो निगेटिव्ह आल्यामुळे त्याला आज सुटी मिळाली.  बुलडाणा शहरात केवळ एकच व्यक्ती  जो नव्याने संसर्गित आढळला होता तोच पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणून उरलेला आहे. तर आज सुट्टी होणाऱ्यांमध्ये *चिखली, देऊळगावराजा आणि शेगाव* येथील कोरोना बाधीत यांचा समावेश आहे.  एकंदरीत आज पाच कोरोना बाधित निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची  संख्या 12 वर येऊन ठेपली आहे. निश्चितच बुलडाणेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे

No comments:

Post a comment