तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

तर आणखी 6 कोरोना बाधितांना मिळू शकतो डिस्चार्ज


बुलडाणा, 19 एप्रिल

_कोरोना विरोधात जिल्हा प्रशासन कडवी झुंज देतांना दिसत आहे. यंत्रणेच्या पॉझिटीव्हीटीपुढे कोरोना निगटिव्ह झाला आणि पहिले 3 कोरोना बाधित बरे होवून घरी रवानासुद्धा झालेले आहेत. या श्रृंखलेत आता नंतरच्या 6 कोरोना बाधितांचा क्रमांक लागण्याची शक्यता आहे. आज त्यांचे स्वॅब अकोला येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर चोवीस तासाच्या आत पुन्हा एकदा स्वॅब तपासणी केली जाईल आणि तोही रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर दोन्ही निगेटिव्ह रिपोर्टच्या आधारे सहा जणांना कोरोना रुग्णालयातून अर्थात जिल्हा स्त्री रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. जर असे झाले तर कोरोना संसर्गीतांची संख्या आणखी सहा ने कमी होऊन ती 11 वर येईल आणि बुलडाणा जिल्हा रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये येऊ शकेल.  त्यातही महत्वाचे म्हणजे नवीन एखादा रुग्ण जिल्ह्यात आढळला तर आकडे पुन्हा वाढू शकतील._

जिल्ह्यात आज प्राप्त 9 कोरोना अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात एकूण 21 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळले होते.  त्यापैकी एक मृत आहे.  त्यापैकी तीन रुग्णांचे फेर तपासणी नमुने  कोरोनासाठी निगेटीव्ह आले असून त्यांना यापूर्वी वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित 17 रूग्णांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
  तसेच आज 19 एप्रिल रोजी 9 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 9 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 11 आहेत आणि कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले  पॉझिटिव्ह रूग्ण 17 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 297 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

बुलडाणा जिल्हा रेड झोनमध्ये ः

 मालवाहतूकीला परवानगी अशक्यच

_आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑरेंज आणि ग्रिन झोनसाठी उद्योग सुरु करण्याबाबत सशर्त शिथीलतेची घोषणा केली आहे. या दोन झोनमध्ये जिल्हा अंतर्गत मालवाहतूकीलाही त्यांनी परवानगी दिली आहे. पण बुलडाणा जिल्ह्याला यातून कुठलाही दिलासा नाही. कारण 21 संसर्गीतांमुळे बुलडाणा रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यातील एक मृत आहे आणि 3 कोरोनाबाधित बरे होवून घरी गेलेले असले तरी आकडा 17 वर थांबलेला आहे. 15 किंवा त्यापेक्षा अधिक कोरोना बाधित असले की, तो जिल्हा रेड झोन गणला जातो. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच संचारबंदी आणि निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील सुत्रांनी  दिली. संध्याकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासनासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फ्रन्सींग करणार होते. त्यात जर काही सकारात्मक घडले तर कदाचित निर्बंध शिथील होवू शकतील अन्यथा डब्ल्यूएचओच्या मानकाप्रमाणे बुलडाणा रेड झोनमध्ये आहे._
--

No comments:

Post a comment