तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

डॉक्टरांवर हल्ला केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, जामीनही नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय


नवी मुंबई (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचं (Corona Pandemic) मोठं संकट सध्या (Attack On Doctors) देशावर आहे. या संकटात आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी एखाद्या सुपरहिरोप्रमाणे आपल्यासाठी लढत आहेत. मात्र, अशा परिस्थितही देशात या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याच्या दुर्दैवी घटना पुढे येत आहेत. मात्र, आता केंद्रातील मोदी सरकारने वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत कठोर निर्णय घेतला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तीन महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या (Attack On Doctors) शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत एक अध्यादेश पारित करण्यात आला. याअंतर्गत आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये तीन महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी याबाबतची माहिती दिली. देशात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. सरकार हे सहन करणार नाही. सरकारने याबाबत एक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाअंतर्गत शिक्षेची (Attack On Doctors ) तरतूद करण्यात आली आहे..

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही

या अध्यादेशानुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही आणि 30 दिवसांच्या आत या प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल. एका वर्षाच्या आत यावर निर्णय सुनावण्यात येईल. या प्रकरणी दोषीला 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याशिवाय, गंभीर प्रकरणांमध्ये 6 महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. इतकंच नाही तर, गंभीर प्रकरणांमध्ये 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंड आकारण्यात येईल. सरकारच्या अध्यादेशानुसार, जर कुठल्या वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, तर त्या गाडीच्या बाजार मूल्याच्या दुप्पट भरपाई आकारली जाईल, असं जावडेकरांनी सांगितलं. याबाबत नवी मुंबई शहरातील बाल रोग तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमरदीप गरड यांच्याशी संपर्क साधला असता केंद्र सरकारच्या या निर्णयाच त्यांनी स्वागत केलं..

डॉक्टरांवर हल्ले केल्यास शिक्षेची तरतूद काय?

 जामीन मिळणार नाही
 30 दिवसात खटल्याचा तपास
 1 वर्षात प्रकरण निकाली
 दोषीला 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा
 गंभीर प्रकरणांमध्ये 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा
 गंभीर प्रकरणांमध्ये 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंड
 वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गाडीवर हल्ला झाल्यास दुप्पट वसुली

No comments:

Post a comment