तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदागौळ येथे सुंदरभाऊ गित्ते यांनी 725 कुटूंबाना 1450 साबनांचे केले घरपोहच वाटप केले! ; गावातील नागरिकांनी घरीच राहून स्वच्छ राहण्याचे केले आवाहन!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून ग्रामीण भागात खबरदारी सुद्धा घेण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक क्षेत्रात असलेल्या नंदागौळ या गावात युवा नेतृत्व सुंदरभाऊ गित्ते यांच्या माध्यमातून गावातील 725 कुटुंबाना सुमारे 1450 Antiseptic Savlon साबनांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले.यावेळी पुणे,मुंबई व ईतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी किमान 14 दिवस होमक्वारंटाईन मध्ये राहून कुटुंबातील व ईतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये.तसेच गावात सुद्धा सुद्धा संचारबंदीचे पालन करावे असे आवाहन करून या दिलेल्या savlon साबनांनी नेहमी हात धुवून स्वच्छता राखावी.त्याच बरोबर घरीच राहून लॉकडाऊनच्या काळात स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन सुंदरभाऊ गित्ते यांनी केले.यावेळी उपसरपंच शिवाजी गित्ते,तसेच सिद्धेश्वर मुंडे,व्यंकटी गित्ते,बालाजी गित्ते,वैजनाथ गित्ते,राजाभाऊ जगताप,शंकर जगताप,यांच्यासह गावातील दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment