तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

घरातल्या घरात लॉक असलेल्या मंगरुळपीर तालुक्यातील 8 हजार निराधारांचे जनजीवन झाले "डाऊन"मानधन न मिळाल्याने निराधारांचे वांदे ; नियोजनाचा अभाव

मंगरुळपीर(फुलचंद भगत) :-  निराधार लाभार्थ्यांसाठी त्यांचे मासिक अनुदान म्हणजे जीवन जगण्याचे साधन आहे.   या अनुदानावर त्यांचे जीवन अवलंबून असते. लॉक डाऊन च्या काळात अनुदान न मिळाल्याने निराधारांचे कंबरडे मोडले आहे. अन्य विभाग जोरदारपणे काम करीत असताना संगायो विभागाने मात्र निराधारांना त्यांची जागा दाखवून दिली असून लॉक डाऊन काळात तालुक्यातील जवळपास 8 हजार 500 निराधार लाभार्थी मानधनापासून वंचित राहिले आहेत.
कोरोना लॉक डाऊनच्या काळात मोठं-मोठे व्यक्ती, उद्योग प्रभावित झाले असतांना निराधार कसे तग धरू शकत हे कोणीही समजू शकते कळू शकते मात्र मंगरुळच्या पाषाण ह्र्दयी संगायो विभागास मात्र दया आली नाही अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यां मद्धे निर्माण झाली आहे. हजारो लाभार्थ्यांचे मानधन बंद करण्याचा सपाटा लावल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. सबंधित अधिकारी निराधारांना जुमानत नसून अनेकदा त्यांनी निराधारांना अक्षरशः हाकलून दिल्याची उदाहरणे असल्याचे युनूस खान यांनी सांगितले त्यांना निराधारांची दया येणे म्हणजे जगातील आठवे आश्चर्य ठरू शकते असेही ते म्हणाले संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ योजना , इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेसह वृध्द , निराधार , अंध , दिव्यांग , विधवा हे आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकात येत आहेत परंतु कोरोणाचे सक्रमन आणी महामारी रोखन्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडुन संचारबंदी लागु केली आहे त्यामुळे अच्छे अच्छे हवालदिल झाले असतांना निर्धाधारांचे तर कंबरडे मोडले आहे या लाभार्थ्यावर उपासमारीची वेळ आली असून औषधपाणी व इतर गरज भागविणे त्यांना कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थिती निराधारांना मानधन दिले जावे यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असतांना निराधारांविषयी आधीच असलेला द्वेष मात्र कारणीभूत ठरत असल्याचे चर्चा आहे. तालुक्यात इतर विभागांनी बरीच समाधानकारक कामगिरी केली असून संगायो विभाग लॉक डाऊन व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यातून मिळालेल्या सवलतीचा पुरेपूर लाभ घेण्यात गुंतला आहे. तालुक्यात नाविन्यपूर्ण व स्वयंपुढाकारातून महसूल विभागाचा डोलारा सांभाळणाऱ्या शिलेदाराची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
त्यांना दिलासा देन्यासाठी सर्व योजनांच्या लाभार्थ्यांचे तिन महिन्याचे अनुदान एकञ देन्याची तसेच मंगरुळपीर तालुक्यातील बहुतांश या योजनाधारकांचे अनूदान बंद केले होते ते सुरु करुन त्यांच्या खात्यात अनूदान जमा करावे अशी मागणी प्रशासनाकडे  समाजसेवक युनूस खान यांनी केली आहे. यांनी केली निराधार योजनेतील आणी ईतर योजनेतील लाभार्थी गरीब असुन त्यांचे हातावरचे पोट आहे . सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थीतीत त्यांच्यावर जीवन जगन्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे . शासनाने संवेदनशिलतेने विचार करुन अशा लाभार्थ्यांचे बंद केलेले अनुदान सुरु करावे , आधीचे मानधन खात्यावर त्वरीत टाकावे तसेच पुढील तिन महिन्याचे एकत्रितपणे वाटप करावे अशी मागणी युनूस खान यांनी केली आहे.निराधारांचे प्रश्न न सोडवणार्‍या कर्मचार्‍यांची बदली केल्याशिवाय निराधारांचे प्रश्न सुटणार नाहीत परंतु उपविभागीय अधिकारी यांनी आश्वासन देऊनही तहसीलदारांनी सबंधित लिपिक यांची बदली केली नसल्याने निराधारांच्या अडचणी सुटणे शक्य नसून जिल्हा प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप माहिती युनूस खान यांनी केला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

No comments:

Post a comment