तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

परळीतील थर्मल टेस्टिंगच्या चौथा दिवशी प्रभाग 9 मधे हजारो नागरिकांची तपासणी पूर्ण- सभापती किशोर पारधे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या ‘नाथ प्रतिष्ठान’ व मुंबई येथील ‘वन रुपी क्लिनिक’च्या माध्यमातून परळी मतदारसंघात नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग सुरू आहे. आज प्रभाग 9 शिवाजी नगर , नागसेन नगर , अशोक नगर , इराणी वस्ती , आंबेडकर नगर मधे  हजारा हून अधिक नागरिकांची थर्मल टेस्टिंग च्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.
थर्मल टेस्टिंगच्या आज शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधे करण्यात आली या  भागांमध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन ही तपासणी करण्यात आली. आज तपासणीची सुरुवात या भागातील नगरसेवक तथा आरोग्य व स्वच्छता सभापती किशोर पारधे  यांची प्रथम तपासणी करून करण्यात आली.अगदी  नगण्य स्वरूपात 2  नागरिकांना ताप सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना कोरोना चाचणीचा (swab test) सल्ला दिला असल्याचे वन रुपी क्लिनिकचे डॉ .राहुल घुले व डॉ प्रदीप राठोड यांनी दिला यावेळी प्रभागात टेस्टिंग करून घेण्यासाठी डॉ टीम सोबत या भागातील नगरसेवक किशोर पारधे , ह .भ .प .भरत महाराज गुट्टे , रुषि राठोड युवा नेते , अमोलजि सूर्यवंशी , अमोल कानडे , राजुभाऊ कांबळे , बाबासाहेब गायकवाड , रामभाऊ ढेंगळे , रविराज राठोड , भैया मस्के , चिकू शेख , संदीप गायकवाड , सुभाष किवण्डे ,विकास रूपणर , शुभम नागरगोजे,आकाश अनाकाडे , बाळू शिंदे ,  सतीश कसबे , पवन वाघमारे , खमर आली , मोहम्मद बेग ,  आदींनी नागरिकांशी समन्वय साधून यशस्वी टेस्टिंग करून घेतले. या टेस्टिंगला प्रभाग 9 मधून चांगला प्रतिसाद मिळाला .तसेच सर्व नागरिकांनी ना .धनंजयजि मुंडे साहेब यांचे आभार मानले

No comments:

Post a comment