तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

तरूणाईला वाचन संस्कृतीचा विसर,बालाजी सरकटे यांचा या संदर्भात लेख       
साखरा .प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 
        
वाचाल तर वाचाल कशी उक्ती आहे, तथापि हि  उक्ती सध्याच्या युवकांना लागु  होत नाही आधुनिकतेमुळे युवकांचे वाचना कडे  दुर्लक्ष होत आहे,परीणामी  वाचन संस्कृतीच नष्ट होण्याची मार्गावर आहे, त्यामुळे युवा पिढी भरकटण्याची शक्यता बळावली आहे. देशात अनेक महान कवी संत शास्त्रज्ञ साहित्यिक अंतराळवीर लेखक आदि थोर व्यक्ती आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात मौलीक विचारधन ग्रंथरूपाने ठेवा म्हणून आपल्याला दिले, 
त्या पुस्तकाचे युवकांनी वाचन करण्याची खरी गरज आहे, मात्र युवकांनी आता वाचनाकडे  पाठ फिरवली आहे, वाचनालयात युवा वाचकांची संख्या अत्यंत तोडकी असते, याऊलट हाँटेल,ढाबे,थियटसॅ,पानठेला, इंटरनेट कॅफेमध्ये युवकांची गर्दी झालेली बघायला मिळते,*वाचाल तर वाचाल*,या उक्तीप्रमाणे अथॅ मोठा आहे, तुम्ही वाचन केले.तरच उद्या तुम्हाला जगता येईल असा या उक्तीचा अथॅ होतो, जगण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे, तसेच वाचनही अत्यंत गरजेचे आहे,वाचन केले नाही,तर कुणी मरणार आहे,असे नाही,तथापी वाचन न केल्याने आपणाला अनेक बाबी माहित होत नाहीत, त्याचा नीट अथॅ कळत नाही, जगण्याची उमेद निर्माण करणारे साहित्य त्यासाठी उपयोगी पडते,मात्र हल्ली युवकांनी जुन्या उक्ती बदलून टाकल्या आहेत, हल्ली युवक आळशी , कामचुकार होत आहेत, असा नेहमी आरोप केला जातो, युवकांनी वाचनाकडे पाठ फिरविल्याने तो काही वेळ खरा वाटुन लागतो,भारताची लोकसंख्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे,मात्र एवढ्या मोठ्या  लोकसंख्येच्या देशात आॅलपिकमध्ये एका सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यात आपला देश अपयशी ठरतो, उलट हाच भारत एड्समध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे,हे कुणाच्याच लक्षात येत नाही, त्यामुळे युवा पिढी नेमकी कोणत्या मार्गाने चालली आहे, यांचे चिंतन होणे गरजेचे झाले आहे,जग सध्या अत्यंत जवळ आले आहे, विज्ञानाच्या प्रगतीमुळे भौगोलिक अंतर  जरी जादा असले ,तरी संपर्काचे अंतर अत्यंत कमी झाले आहे,क्षणात लाखो किलोमीटर अंतरावरील व्यक्तीशी संपर्क साधता येतं आहे,मात्र या बदलत्या आणि गतिमान जगात विविध सोयी-सुविधामुळे युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे, सध्या मुले सवॉधिक काळ दुरचित्रवाणी,संचार समोर बसलेले आढळतात, तासनतास आपला वेळ चित्रपट व मालिका व इतर कार्यक्रम बघण्याकडे घालवितात, त्याचबरोबर काही युवक दिवसभर केवळ खेळण्यावरच  भर देत आहे,युवक केवळ परीक्षा आली,कि अभ्यासापुरतेच वाचन करतात,परीणामी सध्याचा युवक, विद्यार्थी,केवळ परीक्षाथीॅच झाला आहे, पाठ्यपुस्तकाशिवाय ते काहीही वाचत नाहीत, अवांतर वाचन,हा शब्दचं आता नकोसा झाला आहे,


*बालाजी सरकटे,तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिंगोली,मो,९४२१९२०१९२तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment