तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

माजलगाव तालुक्यात कोरोनाविरुद्ध लढाईत डॉक्टर पोलिसासह शिक्षकही देताहेत योगदान

कर्मचारी अधिकारी रस्त्यावर असताना जनतेनी घरीच राहण्याचे आवाहन

माजलगाव (प्रतिनिधी) :- देशासह संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स,पोलीस व सफाई कामगार दिवस-रात्र मेहनत घेत असताना माजलगाव तालुक्यातील शिक्षकही यामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. अशा जागतिक महामारी मध्ये आम्ही जनतेसाठी रस्त्यावर आहोत, जनतेने मात्र स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन कर्मचारी करताना दिसत आहेत.कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यात  सादोळा आणि गंगामसला या दोन ठिकाणी विशेष चेक पोस्टची व्यवस्था मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,उपविभागीय अधिकारी डीसले यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांनी केलेली असून यात शिक्षकही महत्त्वाचे योगदान देताना दिसत आहेत.
जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन  करणार्‍यावर कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिमतीला या राष्ट्रीय कार्यात शिक्षकही योगदान देत आहेत. गंगामसला येथील चेक पोस्टवर शिक्षक सचिन जोगदंड, पिराजी वानोळे, लिंबाजी सोनपसारे,अमित वाघमारे, एन.डी. रत्नपारखी, पी.ए.फपाळ, अशोक कोपले, अनिल राठोड, बाळासाहेब माने, रामराव राठोड,बबन जाधव, शेषराव पवार, जीवन डोंगरे, एस.सी. खुळे,मोगल सलीम, पवार गेनू, एम.के.खतीब कार्य करीत आहेत तर सादोळा चेक पोस्टमध्ये पोलीस उपनिरीक्षक माने यांच्यासह शिक्षक संतोष साबळे, विवेक गुडले,अशोक राठोड,तोकलवाड देवराव, अब्दुल शेख,बालासाहेब मुंडे, भारत राऊत,भीमा राठोड, कैलास शिंदे, भैरू कोळी, राम जोगदंड, प्रकाश इंगळे, साहेबराव चव्हाण, आसाराम कूरे, उमाकांत आंधळे आदी शिक्षक कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी,सफाई कामगार यांच्यासह शिक्षकांचेही सर्वस्तरातून कौतुक होत असून ज्याप्रमाणे आरोग्य व पोलिस कर्मचारी यांना ५० लाखाचा विमा शासनाने लागू केला आहे त्याचप्रमाणे पत्रकार आणि शिक्षकांनाही तो लागू करण्याची मागणी अनेक संघटना करीत आहेत. या लॉक डाऊन कालावधीत जनतेनी प्रशासनाला सहकार्य करतानाच नागरिकांनी  स्वतःची काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.

No comments:

Post a Comment