तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

संगम येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती  परळी तालुक्यातील मौजे संगम येथे साजरी करण्यात आली.
           ..मंगळवार दि.14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9 वाजता बुद्ध विहारात  सरपंच वत्सलाबाई कोकाटे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण  करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे हे उपस्थित होते. लॉर्ड बुध्दा मिञ  मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सुरक्षित अंतर ठेवून   सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून  अभिवादन  केले. कोरोना संसर्गजन्य महामारी मुळे  बौद्ध बांधवांनी या रोगामुळे  घराच्या बाहेर न जाता आपआपल्या घरी पूजा करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेला   अभिवादन केले.

No comments:

Post a comment