तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

रमजान काळात घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करा;आ दुर्रानी यांचे आवाहन

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-पवित्र रमजान महिण्याला प्रारंभ झाला आहे या कालावधित मशिदीत,रस्त्यावर नमाज पठणा साठी गर्दी न करण्याचे आवाहन फेसबुक पोष्टच्या माध्यमातून आ बाबाजानी दुर्रानी आणि पाथरी न प चे गट नेते जुनेदखान दुर्रांनी या  पिता पुत्रांनी समाज बांधवांना केले आहे.
फेसबुक वर केलेल्या पोष्ट मध्ये ते म्हणतात की, पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा; रमजान मुबारक!

सर्वप्रथम पवित्र रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो, या पवित्र सणाच्या काळात आपल्या देशात व संपूर्ण जगात कोरोनाच संकट आल आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व देशवासियांचं योगदान महत्वाचं आहे. सर्व बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करून रमजानाच्या काळात घरातच थांबावं, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, नमाज पठण, तरावीह, इफ्तारसाठी मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र येऊ नये असे आवाहन व विनंती करतो.

रमजानच्या काळात कोरोना प्रतिबंधक नियम, निर्देशांचं काटेकोर पालन करावं, कोरोनापासून स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करावं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांची एकजूटच यश मिळवून देणार आहे. आपली तसेच परिवाराची काळजी घेऊन रमजान साजरा करु, प्रशासनास सहकार्य करू आणि संपूर्ण जगाला आपली एकी दाखवुन कोरोनावर मात करू.

- आ.बाबाजानी दुर्राणी.

न प गट नेते जुनेद खान दुर्रानी म्हणातात की,
सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा!
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपण स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची काळजी घ्यावी. नमाज, तरावीह पठण, इफ्तारसारखे धार्मिक कार्यक्रम घरातच करावे. 
प्रशासनास सहकार्य करू आणि संपूर्ण जगाला आपली एकी दाखवुन कोरोनावर मात करू.
#रमजान_मुबारक

No comments:

Post a Comment