तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

फुलोरा ऑनलाईन यूट्युब लाईव्ह कवीसंमेलन काल मोठ्या दिमाखात संपन्न


सध्या लॉकडाऊन मुळे देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती बघता काव्य संमेलन घेणे शक्य नाही, हे ओळखून फुलोरा परिवार सदस्य माननीय सौ .सीमा गांधी यांच्या कल्पनेतून व फुलोरा समूह अध्यक्ष श्री सुनील सातपुते यांच्या प्रयत्नातून काल दिनांक 12 एप्रिल २०२०रोजी  यूट्युब लाईव्ह हे ऑनलाइन काव्य संमेलन पार पडले .या काव्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिका सौ. जोत्स्नाताई चांदगुडे यांनी भूषवले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. चंद्रकांत दादा वानखेडे, मा.डॉ.प्रा. अशोक कुमार पगारिया, मा. पुरुषोत्तम सदाफुले ,मा. प्राध्यापक सुरेखाताई कटारिया मा.अनुज केसकर मा.प्रदीप कदम, मा. सुहास घुमरे, मा. दिनेश भोसले, त्याचबरोबर फुलोरा कोर कमिटीचे सदस्य रज्जाक शेख, रंजनाताई बोरा यांच्या उपस्थिती बरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कवींनी या संमेलनात भाग घेतला मा. बंडा जोशी यांची हास्य कविता फारच रंगली, वेगवेगळ्या विषयांच्या कविता त्यात सर्वांना घरबसल्या पहायला मिळाल्या. काल दुपारी चार वाजता हे संमेलन सुरु झाले,  जवळ जवळ चार तास हे संमेलन चालले,यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 83,कवी कवयित्री  सहभागी झाल्या होत्या.सुमारे पंधराशे हून अधिक काव्यरसिकांनी  हे संमेलन यूट्युब लाईव्हने घरबसल्या त्याचा आनंद लुटला, अशा रितीने झालेले हे मराठी साहित्य विश्वातले पहीलेच संमेलन  online कवीसंमेलन आहे. अशा संकट काळात घरबसल्या लोकांना विरंगुळा,मनोरंजन देणे हे आज खूप महत्त्वाचे झाले आहे, हे ऑनलाईन कवीसंमेलनाच्या    अनोख्या संकल्पनेसह फुलोरा परीवाराने शक्य करून दाखवले आणि काव्यरसिकांची मने जिंकली, अशी online कवीसंमेलने भरवण्या साठी काव्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.कवयित्री सौ. सीमा गांधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन फुलोरा समूह अध्यक्ष मा. श्री सुनील सातपुते यांनी केले.

No comments:

Post a comment