तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

स्वंयम शिक्षण प्रयोग तर्फ अन्नधान्याचे कीट वाटप ..........आकाश लश्करे
उस्मानाबाद

कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात धुमाकुळ घातला आहे कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंम  शिक्षण प्रयोग ग्रामीण भागात जनजागृती करत आहे. या संचारबंदीमुळे अनेकांचा रोजगार हिस्कावला गेला आहे. स्वयंम शिक्षण प्रयोग  संस्थेचा एक मदतीचा हात म्हणून  लोहारा तालुक्यातील कास्ती खू  या गावात गरजू व गरीब महींलाना अन्नधान्य कीटचा वाटप करण्यात आला.
 लॉकडाऊन च्या पाश्वभूमीवर  गावातील गरीब, गरजू ,अपंग अशा  25 महींलाना अन्नधान्याचे कीट  कास्ती (खु)चे सरपंच  सुंदराबाई गुंड यांच्या हस्ते देण्यात आले .उपसरपंच महेश पाटील तंटामुक्ती अध्यक्ष विलास गुंड  आदी मान्यवर उपस्थित होते .
स्वंयम शिक्षण प्रयोगच्या संवाद सहाय्यक  राजकन्या हजारे यांनी अन्नधान्य कीट सोबत  25 कुंटुंबाना प्रत्येकी 2 शेपुची भाजीची पेंडी व मास्क फ्री मध्ये देण्यात आले जीवनावश्यक वस्तु वाटप करत असताना महीलांना 3 मीटर अंतरावर उभे राहून व सॅनीटायझरचा वापर करून धान्य वाटप करण्यात आले .हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पुर्ण करण्यासाठी  स्वंयम शिक्षण प्रयोगचे   अंकिता पाटील ,शीतल रणखांब व राजकन्या हजारे यांनी सहकार्य केले

No comments:

Post a comment