तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजची कमाई बुडणा-या कामगारांपुढे भविष्यात आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान ; मंगल कार्यालये, मंडप लाईट, साऊंड, केटरिंग व्यवसायांना फटकापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून या आजाराचा फटका फक्त काही शासकीय खाजगी कामालाच नाही तर त्याचा विविध व्यवसायावर परिणाम झाला आहे. मार्च अखेरीस व एप्रिल महिन्यात लग्नसराई ला सुरुवात होणार असल्याने मंगल कार्यालये, मंडप लाईट, साऊंड, केटरिंग अशा व्यवसायांना कोरोनाचा फटका बसत आहेत.

_कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने याचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सामुदायिक ठिकाणी गर्दी झाल्यास आजारांचा फैलाव होऊ शकतो. यासाठी सार्वजनिक कार्यक्रम जत्रा, यात्रा, धार्मिक सोहळ्यावर देखील काही प्रमाणात बंधने घातली असून मार्च अखेरीस व एप्रिल महिन्यात होणाऱ्या विवाह संस्कारांवर कोरोनाचे सावट निर्माण झाले असून आपल्या विवाह संस्कारावर कोरोनाचा प्रादुर्भाव नको यासाठी विवाह संस्कार पुढे ढकलण्याची वेळ पालकांवर येऊन ठेपली आहे. परिणामी मंगल कार्यालय, मंडप, लाईट, साऊंड , केटरिंग या व्यवसायांना फटका बसत असून या व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना रोजगारासाठी धडपडावे लागत आहे. रोजची कमाई बुडणा-या कामगारांपुढे भविष्यात आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे. या व्यवसाय धारकांवर मोठे संकट उभे राहिले आहे.

No comments:

Post a comment