तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

पत्रकार बालाजी देशमुख ह्यांना बातमी का लावली म्हणून मारहाण ६ जणा विरूद्ध गुन्हा दाखल

 अखिल भारतीय ग्रामीण पञकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी दशरथ देशमुख रा .गुगळपिंप्री यांनी जलयुक्त शिवार बांधार्यावर अवैधरीत्या  रेती चा वापर करत आसल्या बद्दल ची बातमी ते ज्या  एमडी  टिव्ही चे प्रतीनीधी म्हणून काम पाहतात त्या वर दिनांक २४/४/२०२० रोजी प्रदर्शित केली होती त्या मूळे सहा ते सात जणांनी मीळून त्यांना मारहाण करण्यात आली त्या विरूध्द त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून सहा जणां विरूद्ध  १४१,१४७,१४८ ,१४३,१८८,३२३,५०४, ५०६ भादवी  प्रमाणे व २४/४/२०२० रोजी  संचारबंदी आसल्याने १४४ चे उल्लंघन केल्या बद्दल  गु. र.नं.  85/2020  अन्वये गोरेगांव पो.स्टे.गुन्हा दाखल करण्यात आला आहे माञ यामध्ये देशमुख यांच्या खिशातून ५००० रुपये काढुन घेतले होते व ते फियाॕदीत नमुद करण्यात आले होते मात्र गोरेगाव पोलिसांनी ३९५ व पत्रकार संरक्षण कायद्या अन्वये त्यांचे वर गुन्हा दाखल केला नाही तारी हे दोन्ही गुन्हे दाखल करावे आशी मागणी  अखिल भारतीय ग्रामीण पञकार संघ,हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने करण्यात आली असुन जिल्हातील पञकारानी ह्या घटनेचा निषेध करून आरोपींना पत्रकार संरक्षण कायद्या खाली तात्काळ अटक करावी अशी मागणी मा. जिल्हा पोलीस अधिक्षक हिंगोली ह्यांचे कडे करण्यात आली आहे. तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सेनगाव यांच्या वतीने निषेध केला असे निवेदन सेनगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहें या सर्व आरोपी ला तात्काळ 
अटक करा अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कडून केली जात आहें 


वरील मारहाण करणारे गावगुंड  सर्व रेती तस्कर आहेत 

पत्रकाराला मारहाण करणाऱ्या सहा गाव गुंडावर गोरेगाव  पोलिसांमध्ये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे

तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment