तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

वसमत येथे खा.हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते धान्य कीट वाटप
वसमतः  येथे सिताराम म्यानेवर मित्र मंडळद्वारा आयोजित कार्यक्रमात थोरला मठ मठाधिपती श्री.ष.ब्र. १०८ सांब शिवाचार्य महाराज व वेदांतचार्य श्री.ष.ब्र.१०८ दिगांबर शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व हिंगोलीचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते  कोरोनामुळे हाताला काम नसणाऱ्या समाज बांधवांसाठी अन्नपूर्णा धान्य किट,100 बॉटल सॅनिटायजर वाटप करण्यात आले.
    तसेच कोरोनाविरुध्दच्या लढाईत मोठी भूमिका बजावत असणारे नगर परिषद कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी व पोलीस बांधव यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यासाठी  सेंसरयुक्त वार रुम तयार करण्यात आली आहे.  या मशीनमध्ये कमी प्रमाणात औषधी वापरून जास्त लोकांना निर्जंतुक करण्याची प्रणाली वापरली आहे.
   काल *खासदार हेमंतभाऊ पाटील* यांनी वार रूमला भेट दिली व स्वच्छता कर्मचारी यांना सॅनिटायझर बॉटल्स वाटप करण्यात आल्या. 
   यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ काळे, वसमत नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार   उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार, जि.प.सदस्य राजू चापके, शहर प्रमुख बाबा आफूने, नगरसेवक शिवाजी अलडिंगे, श्री. स्वामी, ऍड.रंगनाथ देशमुख, श्याम वाघमारे, किरण दुमाने, विशाल कडतन, राजू बरगळ,गोविंद जलेवार, माधव लाकमवार, तुषार काटकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment