तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

सरकार कडून गोरगरिबांना होणारा धान्याचा पुरवठा वाढविण्याची गरजप्रा.टी. पी.मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
जागतिक महामारी कोविड-19 च्या संकटात गोरगरिबांना रेशन दुकानदारांकडून होणारा धान्यपुरवठा अत्यल्प असल्याने उपासमारी सुरूच आहे त्यामुळे मोफत व माफक दरातील धान्यपुरवठा वाढविण्यात यावा अशी मागणी लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी केली आहे.


    यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की कोविड-19 च्या संकटामुळे देशात लॉक डाऊन असून सर्व व्यवसाय बंद आहेत लाखो शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार व बांधकाम कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यात राज्य सरकारने मजुरांची व गोरगरिबांची उपासमारी टाळण्यासाठी स्वस्त धान्य दुकाना कडून अल्पदरात धान्यपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे


    याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी त्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ वाटप होत आहे. वास्तविक पाहता 5 किलो गहू व 4 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती वाढवून द्यावे तसेच तुर दाळ, मुगदाळ, खाद्यतेल, साखर ,चहा पत्ती यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा अल्पदरात करणे आवश्यक आहे. पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून वर उल्लेख केलेले खाद्यपदार्थ अल्पदराने लोकांना देण्यात येत होते .अनेक कुटुंबात रेशन कार्ड वर दहा-पंधरा वर्षापूर्वीची सदस्यसंख्या आहे त्यात लहान मुलांची ची नावे आहेत ती आता मोठी झाली आहेत त्यामुळे त्यांना धान्य पुरत नाही त्यामुळे अशा कुटुंबांना आधार कार्ड आधारभूत मानून धान्य पुरवठा करावा या कामात गैरकारभार करणाऱ्या रेशन दुकानदारावर तीक्ष्ण नजर ठेवावी तसेच शेतकरी , शेतमजूर,  बांधकाम मजूर,  ऊस तोड कामगार  यांची उपासमार थांबवण्यासाठी  राज्य शासनाने  येत्या महिन्यापासून  धान्य वितरित  करावे राज्य सरकारने  कोणताही घटक  उपवासी उपवास पोटी  झोपणार नाही  असे सांगितले  असताना  मात्र  लाखो  लोक  उपास पोटी  झोपत आहेत  अशी उपासमार  राज्यसरकारने टाळावी आणि याची अंमलबजावणी आठ दिवसात करावी अशी मागणीही लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति पालक मंत्री ,जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत

      देशाचे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ हे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिशय चांगले काम करीत असल्याचे कौतुक लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment