तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करा ―प्रा. टी.पी. मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ... दि 09 एप्रिल
भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती 14 एप्रिल रोजी साजरी होत आहे परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील अनुयायांनी यावर्षी जयंती उत्सव घरातच साजरा करावा असे आवाहन लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी केले आहे.


    सध्या भारतात व जगभरात कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट आहे .या आपत्तीतून सुटका करून घेण्यासाठी सध्या महाराष्ट्र व भारतात संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू केलेला आहे कारण हाच एकमेव पर्याय सध्यातरी कोरोना वर आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या कायद्याचे प्रत्येक अनुयायांनी पालन करावे.


      डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा शहर व ग्रामीण भागातील अनुयायांनी व आंबेडकरी जनतेने आप आपल्या घरातच साजरा करावा महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून मेनबत्ती प्रज्वलित करून त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्या घरात व अंगणात पडेल त्यामुळे लॉक डाऊन ,संचारबंदी ,जमावबंदी कायद्याचे पालन होईल व कोरोना च्या विरोधात सुरू असलेला आपला लढा चालूच राहील असा विश्वासही लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment