तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथील गरीब कुटुंबातील महिला रोज करते मोफत पंधरा लिटर दूध चे वाटपआकाश लश्करे
उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर
 तालुक्यातील वडगाव देव तीन ते साडेतीन वस्ती असलेले छोटे गाव गावामध्ये मंगल नावाची महिला लग्न होउन आली विनायक कालेकर असे तिच्या मालकाचे नाव मंगल ताई च्या वडीलाकडिल् परिस्थिती हलाखिचि असल्यामुळे वडिलांनी जसे जमेल तसे लग्न लावून दिले आता नवऱ्याच्या घरी सुखाने राहू हे स्वप्न घेऊन सासरी आली पण इथे पण तसेच झाले शेती व् दुध् व्यवसायातुन् पूर्ण प्रपंच चालत असे पहात पहात वर्ष वर वर्ष निघून गेले आता मला चार मुली व् एक मुलगा होता आता खरच् वाढला होता बघत बघत दिवस निघून जात होते आता मुली पण मोठ्या झाल्या होत्या कसे तरी डीग्रि पर्यंत शिक्षण केले
व चांगले स्थळ पाहून लग्न लावून दिले 
मला आता घरात बस्वेना सतत काहीतरी करावे वाटू लागले गावात बचत गटाच्या सारख्या मिटिंग होत असे तशी मि सर्व मीटिंगला जाऊन बसत असे एक दिवस उजड्ला व् स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे योगेश बोडके सर गावामधे गटाच्या मिटींगला आले व गावामध्ये "सखी अन्न सुरक्षा शेती" विषयी माहिती सांगितली विष मुक्त शेती कशी करावी याचे मार्गदर्शन केले व् जात जात सरांनी गावातून एक संवाद सहायक निवडाची असे सांगितले तशी मि लगेच तयारी दर्शिवली काही दिवसांनी माझी गावात संवाद सहायक म्हणून निवड झाली याचे उस्मानाबादमध्ये चार दिवसाचे ट्रेनींग तब्बसुम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले ट्रेनींग झाल्या नंतर मि लगेच दुसऱ्या दिवसापासून घरोघरी जाऊन विष मुक्त शेती कशा प्रकारे करायची हे सांगू लागले तसा गावातून मला प्रतिसाद मिळू लागला आठवडय़ातुन् एक वेळ सस्थेच्या वैशालि शिंदे ताई येऊन मार्गदर्शन करत होत्या व् गाव आता विष मुक्त शेती कडे वळत होते आता गावात माझे सर्वांशी अगदी जवळचे नाते तयार झाले होते 
आता मला माझे चांगले दिवस दिसू लागले होते तोच हे कोरोना नावाचे महामारी संकट पूर्ण जागावर आले अमेरिका सारख्या मोठ्या मोठया देशात जनावरे जशी मरतात तशी माणसं मरू लागली आपल्या देशाची लोकसंख्या पहाता आपल्या देशावर पण अशीच परिस्थिती येते की काय याची भीती वाटू लागली पण आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी लगेच येकेविस् दिवस पूर्ण देश बंद करण्याचे आदेश दिले आता परिस्थिती आटोक्यात येईल असे वाटले पण आता तर लोकांचे खाण्या पिण्याचे हाल होऊ लागले गरीब लोक ज्यांचे रोज़गार वर पोट होते अस्याचे तर हाल पहावत नव्हते आता गावातील लोक भीतीने शेतात जाऊन राहू लागले होते शहरामधे तर मोठे मोठे लोक जशी मदत करता येईल तशी मदत करत होते आता मला पण रहावे वाटतं नव्हते व् मि ठरविले की आपण पण काहीनाकाही मदत करायची मग विचार केला कि आपल्याकडे मदत करण्या सारखे फक्त दूध आहे मग काय पंधरा लिटर दूध रोज वाटण्याचे ठरविले व् आज बारा दिवस झाले पूर्ण घरोघरी जाऊन प्रत्येकी एक लीटर् दूध देते व् स्व: खर्चातून हात धुण्यासाठी एक साबण असा दिनक्रम चालू आहे 
शेवटी मि एकच सांगू इच्छिते कि परिस्थिती नुसार ज्याला जमेल तशी मदत करा कारण परिस्थिती खूप नाजूक आहे

No comments:

Post a comment