तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

विद्यापीठाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना धान्यासह जीवनावश्यक वस्तू वाटप
औरंगाबाद (प्रतिनिधी) :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह क्रमांक एक  येथे,गरजू विद्यार्थ्यांना मोफत धान्यसह सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या. विद्यार्थी विकास  विभाग संचालक डॉ. मुस्तजीब खान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वस्तीगृह अधीक्षक श्री. जाधव सर व संशोधक रामप्रसाद वाव्हळ यांच्या नियोजनात सामाजिक अंतर ठेवून  वाटप करण्यात आले, बऱ्याच दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे व  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाहेर गावचे विद्यार्थी विद्यापीठ परिसरात रूम घेऊन किरायाने राहत आहेत,त्यांना यामधून एक प्रकारे मदतीचा हात मिळाला आहे,यामध्ये पाच किलो पीठ, एक किलो तेल,मीठ, हळद, मिरची, तांदूळ व  दाळ हे वस्तू देण्यात आल्या आहेत, पंधरा दिवस पुरेल इतका हा धान्यसाठा देण्यात आला.याप्रसंगी मुख्य समन्वयक रामप्रसाद वाव्हळ, धम्मपाल जाधव,युवराज सुतार,गणेश पानझडे व विनोद अंभोरे यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a comment