तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

लॉकडाऊनमध्ये गुपचुप - गुपचुप दारु विकणारांवर पोलिसांची धडक कारवाई


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : तालुक्यात प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्याने तळीरामांची अडचण होत आहे, अशा परिस्थितीत आपले सर्व संपर्क व कसब वापरून तळीरामांनी दारू उपलब्ध करण्यास सुरूवात केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मोहीम राबवून विक्रेत्यावर कारवाई केली. 
तालुक्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दारू विकणाऱ्या दारू विक्रेत्यावर पोलिसांनी करम ,करम तांडा, उखळी ,नैकोटा ,नरवाडी इत्यादी ठिकाणी छापे मारून सहा दारू विक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कार्यवाही केलेली आहे, ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण सोमवंशी, महेश कवठाळे, पांडुरंग काळे, आंनद कांबळे, बिभीषण मुंडे, नितीन खरात यांनी केली.
यामध्ये राजाभाऊ लक्ष्मण राठोड, राम रुपसिंग राठोड रा. करमतांडा, नंबर लक्ष्मी वामन मुद्दल राहणार करम सुनील भीमा राठोड रा. नैकोटा, वैजनाथ परभू जाधव राहणार नैकोटा , विजयकुमार अंगद पंचांगे रा उखळी, राजेश उर्फ बालाजी भाऊराव कुकाने राहणार नरवाडी यांना ताब्यात घेऊन 87 लिटर गावठी दारू आणि दोनशे लिटर रसायन असा एकूण जवळपास नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वरीलपैकी 6 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment