तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

संचारबंदीच्या काळात चालू ठेवले स्टोन क्रेशर ; मंडळ अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून परळी ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखलपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आणि देशभरात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अनेक व्यक्ती एकाच जागेवर जमणार नाहीत किंवा काम करणार नाहीत अशी काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून लॉकडाऊनच्या काळात स्टोन क्रेशर परळी तालुक्यातील मौजे दाऊतपुर येथे चालू होते. याबाबत मंडळ अधिकारी सुधाकर पुजदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी देविप्रसाद चुन्नीलाल पांडे या स्टोन क्रेशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दि.20 मार्च रोजी केंद्र सरकारचे कामगार सचिव यांनी सर्व औद्योगिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी कटाक्षाने लॉकडाऊन पाळला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या स्टोन क्रेशर चालू होते. मौजे दाऊतपुर येथील ही घटना असून याबाबत कलम 188, 269, 270 भादंवि व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, 51 (ब) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 17 व महाराष्ट्र कोविड -19 उपाय योजना 2020 चे कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक धाईजे यंाच्याकडे देण्यात आला आहे.
कोरोना विषाणू संदर्भात चालू असलेल्या आदेशाचे उल्लंघन करून स्टोन क्रेशर चालक देविप्रसाद चुन्नीलाल पांडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मानवी जीव धोक्यात येईल असे कृत्य करून मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरवल्या प्रकरणी परळी ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी, बीड यांच्या कोरोना विषाणु संदर्भाने चालू असलेल्या आदेशाचे उल्लंघन करून तसेच त्यंानी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मानवी जीव धोक्यात येईल असे कृत्य करून मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव माहित आहे असे असुन सुद्धा स्टोन के्रशन अनाधिकृतपणे चालू ठेवून जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी परळी ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो.ना./1494 धाईजे हे करीत आहेत.

No comments:

Post a comment