तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

परळीच्या तरुणीने रेखाटले हे चित्र कोरोना च्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मानले आभारपरळी - कोरोना संकटाचा मोठ्या हिमतीने सामना करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामान्य जनतेच्या मनामनात विराजमान झाले आहेत, परळीच्या एका महाविद्यालयीन तरुणाने एका चित्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ते चित्र सध्या सोशल मिडिया मध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटूंब प्रमुख या भावनेने कोरोनाच्या संकटात सर्वांना दिलासा देत आहेत, केवळ दिलासाच देत नाहीत तर जनतेमध्ये या संकटाचा सामना करण्यासाठी धर्य निर्माण करत आहेत, अत्यन्त संयमाने,धाडसी निर्णयाने अन गांभीर्याने आपली जबाबदारी पार पाडत आहेत, उद्धव ठाकरे यांनी सामान्य माणसाच्या मना मनात घर केले आहे, लोक आपल्या भावना मोठ्या मनाने व्यक्त करत आहेत, अशीच आपली भावना व्यक्त करतांना परळी येथील मंजुश्री सुरेश घोणे या महाविद्यालयीन तरुणीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक चित्र रेखाटले आहे, ते चित्र सध्या सोशल मीडिया मध्ये प्रचंड व्हायरल झाले आहे, त्यात तिने म्हंटले आहे "अभिमान आहे आम्हाला या पुरोगामी महाराष्टाच्या मुख्यमंत्र्याचा ".

No comments:

Post a comment