तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

कोरोनाच्या लढाईत फार्मासिस्ट कैलास तांदळे ही सरसावले ;कोरोनाच्या लढाईत योध्दा बनले


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना विषाणुचा शिरकाव परळी तालुक्यात होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान व वन रुपी क्लिनिक मार्फत परळी मतदारसंघात घरोघरी थर्मल टेस्टिंग आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. या सर्व टीमला फार्मासिस्ट कैलास तांदळे हे मोलाचे सहकार्य कार्य करून कोवीड योध्दा म्हणून आपले योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याचे धनंजय मुंडे यांनी ही कौतुक केले आहे.तसेच यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
          देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येकजण जबाबदारी निहाय करीत आहे. वन रूपी क्लिनिकच्या सर्व टीम ला घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. आपल्या आरोग्याची पर्वा न करता देशसेवेचे कार्य करतअसून त्यांनी कोरोना  संकटसमयी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी या स्कॅनिंगसाठी सहकार्य करून आपले मोलाचे योगदान देत आहेत.
         राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या संदर्भातील खबरदारी म्हणून त्यांच्या 'नाथ प्रतिष्ठान' व मुंबई येथील सुप्रसिद्ध 'वन रुपी क्लिनिक'च्या मार्फत राज्यात वरळी नंतर थेट परळी मतदारसंघात कोरोनाच्या संदर्भात खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून 'वन रुपी क्लिनिक'च्या मार्फत ही तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. तपासणी करण्यासाठी वन रुपी क्लिनिक चे संचालक डॉ. राहुल घुले यांच्या नेतृत्वात दहा डॉक्टर्सची टीम प्रथमच मुंबई बाहेर वरळी ते थेट परळी आली आहे. पालक म्हणून खरचं आपली भूमिका बजावत आहेत. धनंजय मुंडे साहेब अतिशय सुंदर असे नियोजन केले आहे. त्यांनी कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन बाबत त्यांचे कार्य वाखाणण्याजोगी आहे.
          कोरोनामुळे उद्भवलेल्या भयावह संकट काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वैद्यकीय चाचणी करून भीती दूर करणे तसेच आवश्यक त्या नागरिकास वेळीच वैद्यकीय सेवा मिळवून देणे या उद्देशाने घरोघरी जाऊन ही टीम नागरिकांची थर्मल टेस्टिंग (वैद्यकीय तपासणी) करत आहे. मुंबई बाहेर अशा स्वरूपाची टेस्टिंग करण्याची ही पहिलीच वेळ असून परळी मतदारसंघातील जनतेसाठी ही टेस्टिंग केली जात आहे, यामध्ये नागरिकांनी स्वतःहून पुढे येत निसंकोच टेस्टिंग करून घ्यावी व भयमुक्त रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या सर्व टीमला परळीतील प्रत्येक प्रभागात जाऊन एखाद्या कोवीड योध्दयासारखे कार्य कैलास तांदळे करीत आहेत.
कैलास तांदळे हे नेहमीच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, गोरगरीबांचे, शेतकरी, कुठल्याही प्रकारची मदतीसाठी नेहमीच सरसावलेले असतात. आज त्यांनी ही प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोरोनाच्या संकटात दूतासारखे आवतरत आपले काम करीत आहेत. तांदळे हे सर्व टीमला घरोघरी जाऊन नागरिकांना तपासणीसाठी करण्यासाठी सरसावले आहेत. कोरोनाच्या लढाईत योगदान देऊन आपली भूमिका प्रामाणिकपणे व जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे  संकटाचा सामन्यात त्यांची कामगिरी आणि संवेदनशील भुमीका व उत्कृष्ट कामगिरी महत्त्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैलास तांदळे यांच्या उल्लेखनीय कार्याचे धनंजय मुंडे साहेब यांच्यासह इतरांनी कौतुक केले आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तरी आपली जबाबदारी वाढणार असल्याने भविष्यातील धोका लक्षात घेत यापुढेही सर्वांनी एकत्र लढा उभारून योगदान दिले पाहिजे. बरेच डॉक्टर व आरोग्य कर्मचारी व इतर सर्व प्रशासनातील कर्मचारी कोरोना विरोध लढाईत योद्धा बनले आहेत. त्याचप्रमाणे परळीतील आरोग्य क्षेत्रातील सर्वांनी कोरोनाच्या लढाईत कोवीड योध्दा बनले पाहिजे असे आवाहन तांदळे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment