तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

पालीत माजी सैनिकांचे श्रमदान नाल्यांची केली सफाई, नागरिकांना दिलासा


बीड (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाली येथे एका माजी सैनिकाने सध्याच्या लाँकडाऊन असलेल्या परिस्थितीमध्ये श्रमदान करुन गावातील नाल्यांची सफाई करुन नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
पाली येथील अनुरथ वीर यांनी गत अनेक वर्ष देशाची सिमेवर सेवा केली, गत काही दिवसापूर्वी ते सेवानिव्रत्त झाले आहेत. देश सेवा केल्यानंतर समाजासाठी काही कार्य करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला मार्ग सापडला. सध्या कोरोना आजाराच्या साथीमुळे सर्वत्र लाँकडाऊन आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. तसेच आजाराच्या भितीने नाल्यांची सफाई रखडली होती. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. दुर्गंधीने नागरिकांना त्रास होत होता तर नाल्या जागोजागो तुंबल्या होत्या. याकडे वीर यांचे लक्ष केंद्रीत झाले. त्यांनी या लाँकडाऊनच्या काळात गावातील सर्व नाल्यांची सफाई केली. यामुळे घाण पाणी सरळ निघून जात आहे. तर गावातील दुर्गंधी कमी होऊन स्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे साथ रोगाच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वीर यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a comment