तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्याबाहेर शेतकऱ्यांनी केली गर्दी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत कोरोनाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे सध्या देशात दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू आहे. ग्राणीण भागात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी मार्केटमध्ये गर्दी होऊ नये. यासाठी भाजीवाले व शेतकऱ्यांचे नियोजन करून त्यांना विभागाप्रमाणे विभागणी करून त्या त्या विभागात ठरवून दिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भाज्याफळे विक्री करणे अपेक्षितआहे.

यासाठी आज (१७ एप्रिल) पासून प्रत्येक तालुक्यात भावाचे फलक निश्चित केल्या गेले आहे. मात्र काही शेतकऱ्यांना विकण्यास अडचण होत आल्याच्या कारणावरून काही शेतकऱ्यांनी सकाळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयासमोर गर्दी करून त्यांचा माल विकत घ्यावा, असे मत मांडण्यात आले.  जवळपास १०० च्या आसपास शेतकरी आपला भाजी पाला घेऊन धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयासमोर जमले होते. या सर्वांचा मार्ग काढत धनंजय मुंडे यांनी या जमलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांना बसून विकण्यास परवानगी दिली असून बाकीच्या भाजी फक विक्रते यांना गल्लो गल्ली जून फिरणे बंधन करक असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील साखर कारखाने, विविध जिल्ह्यातील निवारागृहे यांसह ठिकठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या पशुधनासहित कोरोना संक्रमण रोखण्याबाबतची खबरदारी घेऊन आपल्या मूळ गावी स्वगृही परतण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्या काही दिवासांपूर्वी एका पत्राद्वारे केली होती.

No comments:

Post a comment