तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

सरपंच राजाभाऊ फड यांनी एक विहिर दोन बोअर अधिग्रहण करुन दिला कन्हेरवाडी गावाला दिलासापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
मौजे कन्हेरवाडी येथील साठवण तलावातील पाणी कन्हेरवाडी नदी पात्रता सोडा अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली होती माञ अद्याप याची प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे आणी गावचा पाणीप्रश्न गंभीर झाल्याने सरपंच राजाभाऊ फड यांनी जवाबदारी स्विकारत गावातीलच एक विहिर आणी दोन बोअर अधिग्रहण करुन गावाचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडवला असुन गावकरी याबाबत समाधान व्यक्त करत आहे.
कन्हेरवाडी गावातील नागरिकांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.शिवाय मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा त्रास दूर करण्यासाठी तलावातील पाणी नदीपात्रात तातडीने सोडवे अशी मागणी ग्राम पंचायत कन्हेरवाडीच्या वतिने प्रशासनाच्या निदर्शनास आणुन वेळोवेळी निवेदने देऊन मागणी केली परंतु ना गावची चिंता ना ग्रामस्थांची किंवा मुक्या जनावरांची काळजी कोणी घेत नसल्यामुळे गावचे संवेदनाशील आणी कर्तव्यदक्ष सरपंच राजाभाऊ फड यांनी पुन्हा एकदा पाणीप्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन गावातील मैनीनाथ अंबाजी फड,वसंत आबासाहेब मुंडे व लहुदास राजाराम रोडे यांची एक विहिर आणी दोन बोअर आधिग्रहण करुन ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सोडवला असुन गावातील ग्रामस्त याबाबत समाधान व्यक्त करत आहे.साठवण तलावाचे पाणी नदीपाञात सोडवुन घेण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्नशील राहुन गावच्या जणावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी लढा हुभा करुन प्रश्नमार्गी लावणार असल्याचे ही राजाभाऊ फड यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a comment