तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

यावर्षी मोसमी पाऊस वेळेआधीच होणार हजर


30 मे रोजी केरळमध्ये येणार, अमेरिकन हवामान कंपनीचा अंदाज

नवी दिल्ली (प्रतिनिधी) :- वर्ष 2019 च्या मुसळधार अतीवृष्टीच्या आठवणी अद्याप ताज्या असताना आणि कुठल्याही प्रशासनाने अतीवृष्टीतील संकटांतून बाहेर येण्यासाठी अद्यापपर्यंत कसलेही नियोजन केलेले नसताना आलेल्या पावसाच्या बातमीला सावधगिरीचा इशार मानणे क्रमप्राप्त ठरणार आहे. देशात यंदा मोसमी पावसाला अनुकुल वातावरण असून सामान्य ते जादा असे प्रमाण राहू शकते. यंदा पाऊस त्याच्या निर्धारित वेळेआधी 30 मे रोजी केरळच्या किनारपट्‌टीच्या प्रदेशात दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या अमेरिकेच्या हवामान अंदाज्‌ वर्तवणाऱ्या कंपनीने प्रसिद्ध केला आहे.

स्कायमेट या कंपनीच्यावतीने प्रथम प्रसारित केलेल्या अंदाजात म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात तापमान 40 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. तर काही ठिकाणी हा आकडा 45 अंशाच्या आसपास राहू शकतो. यंदा आतापर्यंत मध्यप्रदेशातील खरगोन जिल्हयात नुकतीच 45 अंशाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या आगमनामध्ये उशीर होत असला तरी यंदा मात्र चांगला पाऊस होण्याची शक्‍यता आहे. प्रशांत महासागरातील अल निनोच्या तापमानावर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अल निनोवर भारताचा मान्सून अवलंबून असतो, असे मानले जाते. तर ला नीनोचा भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होत असतो. हिंदी महासागरातील जलक्षेत्र थंड राहिले तर यंदा 110 टक्के पाऊस होऊ शकतो, असे या अंदाजात म्हटले आहे. तर भारतीय हवामान विज्ञान संस्थेनेही याआधीच्या अंदाजात यंदा पाऊस चांगला राहिल, असे म्हटले होते. या संस्थेच्यावतीने एप्रिल अखेर दीर्घकालीन अंदाज व्यक्त करण्यात येतो.

त्याचबरोबर यंदाचा पाऊस बहुतांश ठिकाणी सरासरीइतका अथवा त्यापेक्षा जास्त पडू शकतो. त्यामुळे कोरड्या दुष्काळाची आपत्ती यंदा ओढवणार नसून, अतिरिक्त पावसाच्या पाण्याच्या साठ्याचे नियोजन आतापासूनच केले पाहिजे, असे स्कायमेटने म्हटले आहे.

No comments:

Post a comment