तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

गरिबांना मिळणार्या धान्यात काळाबाजार करणाऱ्यांची गय नाहीआमदार रत्नाकर गुट्टे महसूल विभाग व स्वस्त धान्य दुकानदार सोबत चर्चा

आरूणा शर्मा

पालम :- कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लाँकडाऊन करण्यात आले असून हातावर पोट भरणाऱ्या गरीब कुटुंबाचे अत्यंत हाल होत असून अशा हलाखीच्या परिस्थितीत राज्य व केंद्र सरकारकडून गरिबांना स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत धान्याचे वाटप केले जात आहे परंतु काही ठिकाणी धान्य वाटप योग्य होत नसल्याच्या तक्रारी येत असून धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार डॉक्टर रत्नाकरराव गुट्टे यांनी तेज न्यूजशी बोलताना दिला
 पुढे बोलताना आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे म्हणाले की लाँकडाऊनमुळे मजुरांना घराच्या बाहेर पडता येत नाही केवळ शासनाने दिलेल्या मदतीवरच आपली उपजीविका भागवावी लागत आहे शासनाने चालू  केलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धान्याचे वाटप चालू आहे या दोन्ही योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी कार्डधारकांना सवलतीच्या दराने दोन महिने कालावधी करीता लवकरच धान्याचे वाटप होणार आहे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजने अंतर्गत सध्या धान्याचे वाटप चालू असून काही ठिकाणी धान्य वाटप योग्य रीतीने होत नसल्याच्या ग्रामस्थांकडून तक्रारी येत आहेत तसेच स्वस्त धान्य दुकानदार ही गोदामपाला कडून प्रत्येक पोत्यामागे दोन ते तीन किलो कमी धान्य मिळत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत याकरता महसूल विभाग व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी मी चर्चा केली असून कोणाकडूनही जर धान्याचा काळाबाजार झाल्यास त्यांची गय केली जाणार नाही त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारानेही आपल्या गावात गरिबांना योग्य धान्य पुरवठा करावा तसेच गोदामपालाने स्वस्त धान्य दुकानदाराना चलन प्रमाणे धान्य देण्यात यावे  अन्यथा कोणाकडूनही धान्याचा काळा बाजार झाल्यास त्यांची गय केली जाणार नाही त्यांच्याविरुद्ध वरिष्ठाकडे तक्रार करून त्यांची चौकशी केली जाईल असा इशारा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी तेज न्यूजशी बोलताना दिला.

No comments:

Post a comment