तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

स्वयंम शिक्षण प्रयोग कडून कोरोना संदर्भात जणजागृतीलातूर (प्रतिनिधी)

गाव -पान चिंचोली, तालुका निलंगा, जिल्हा लातूर स्वयं शिक्षण प्रयोग च्या माध्यमातून मे 2019 पासून अन्नसुरक्षा शेती प्रकल्पामध्ये सौ प्रिया खोत गावातील शंभर अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांसोबत काम करत आहेत. व तालुका समन्वयक म्हणून अंजना साबळे काम करत आहेत. शाश्वत शेती महिला सक्षमीकरण शासकीय योजना शेतीपूरक व्यवसाय समाजातील तळागाळातील महिलांसोबत काम करताना हे काम खूप यशस्वीरीत्या गावात करत आहेत
आत्ता कोरोनाव्हायरस या महाभयंकर भयानक आपत्तीमध्ये गावामध्ये महिलांना गृहभेटी देऊन घाबरू नका आता आपण स्वच्छता आणि या विषाणूजन्य रोगांमध्ये घ्यावयाची काळजी महत्त्वाची आहे असं महिलांना सांगत आहेत .या विषाणूजन्य रोगाची काय काय लक्षणे असतात आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे या विषयी महिलांना माहिती सांगत आहेत.
ही माहिती सांगत असताना त्यांना गावातील विधवा परित्यक्ता रोजगारी कुटुंब व गावाकडे पलायन केलेल्या लोकांची यादी एसटी टीमने त्यांना करण्यास सांगितली. यादी करत असताना गावातील सरपंचांनी त्यांना पाहिले व या काळामध्ये एकही महिला घाबरून घराच्या बाहेर येत नाही आणि या सर्वांना माहिती देत आहेत हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्यांना गावातील ग्रामपंचायत मध्ये बैठकीसाठी बोलावले आणि ग्रामस्तरीय दक्षता समितीमध्ये सदस्य म्हणून घेतले आणि त्यांना डेमो स्टेशन कीट दिले. त्या किटचा वापर करून ग्रह भेट दिल्यानंतर महिलांना हात धुण्याच्या स्टेप सांगताना मुले व वृद्ध दातांची काळजी घेण्यासाठी सांगत आहेत. बाहेर जाऊन आलेल्या लोकांची यादी करणे घेऊन 14 दिवस आशा व अंगणवाडी कार्यकर्ती सोबत जाऊन त्यांची चौकशी करणे व त्यांना विलगीकरण याविषयी माहिती देत आहेत. गावातील महिलांना ज्या महिलांकडे जास्त दिवस टिकणारा भाजीपाला आहे व अन्नधान्य आहे आणि ते आता जास्त प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करून गरीब लोकांना वाटप करण्याची संकल्पना एस एस पी टीम कडून प्रिया ताईंना दिली. सुरुवातीला त्या स्वतः आणि बाकी दोन महिलांना घेऊन त्यांना स्वतःला मिळालेले राशन ज्वारी आणि कांदे बटाटे व लसुन घरी जमा करून यादीमधील अतिशय गरजू 18 महिलांना दिनांक 13 चार 2020 रोजी वाटप केला व 14 चार 2020 रोजी सरस्वती महिला बचत गटातील सहा महिलांनी मिळून प्रति महिला दहा किलो ज्वारी जमा करून राहिलेला महिलांना वाटप करणार आहेत त्याच बरोबर SURE मधून जानेवारी महिन्यामध्ये गटातील एका महिलांनी आटा चक्की घेतली आहे त्यावर प्रति महिला आठ किलो दळण 15 व 16 तारखेला दोन दिवस फ्री मध्ये दळून देणार आहेत.
एस एस पी च्या टीमने भाग्यश्री महिला गृह उद्योग निलंगा येथून मास्क शिवण्यास मिळतात व मोबाईलवर व्हिडीओ कॉलिंग च्या मार्फत त्यांना शिवण्याचे ट्रेनिंग देण्यात येईल असे सांगितल्यानंतर त्यांनी सहा महिलांना प्रति दिवस 100 मास्क शिवण्यास आणून दिले महिला हे मास्क शिवून दिवसाला शंभर रुपये कमावतात व इतर कपडा व घर च सामान यापासून तयार केलेले मास गावात विकत आहेत.

No comments:

Post a comment