तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला आडतीवर माल घेऊन न जाता थेट बाजारात विक्री करावा - मुख्याधिकारी डॉ.अरविंद मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सुधारीत आदेशावरुन परळी येथील तोतला मैदान येथील भाजीपाला आडत व्यापार बंद करुन यापुढे शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला थेट बाजारात विक्री करावा असे परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
परळी नगर परिषदेच्या वतिने शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट आडत व्यापारात घेऊन जाता यावा आणी सोशल डिस्टंसिग राखता यावी म्हणुन जुन्या गावभागातील भाजीपाला आडत व्यापार तोतला मैदानात व्यवस्थित करावा यासाठी नियोजन करु दिले होते.परंतु त्याही ठिकाणी गर्दी वाढु लागल्याने सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांनी आडतीवर घेऊन न जाता आता थेट उद्या पासून मा.जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या संचारबंदी शिथीलतेच्या ठरवुन दिलेल्या वेळेत शेतकऱ्यांनी आपला जो काही भाजीपाला असेल तो नगर परिषदेने आखुन दिलेल्या जागेतच थेट विक्री करावा असे शेतकरी व संबधीत भाजीविक्रेत्यांना परळी नगर परिषदेच्या वतिने मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे यांनी आवाहन केले आहे.

No comments:

Post a comment