तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

कलेक्टर साहेब,माझ्या मुलाला घरी आनुन द्या हो......


युपीएससी एमपिएससी ची तयारी करणार्‍या दिल्लीतील विद्यार्थ्यांना गावी आणन्याची व्यवस्था करा

वाशिम जिल्ह्यातील पालकांची जिल्हाधिकार्‍यांना आर्त हाक

वाशिम(फुलचंद भगत)-सध्या सर्वञ कोरोणा विषाणूचा प्रकोप जाणवत असुन त्याचा प्रार्दुभाव आणी प्रसार रोखन्यासाठी प्रशासनाने सर्वञ लाॅकडाऊन संचारबंदी लावलेली आहे त्यामुळे युपिएससी एमपीएससी च्या प्रशासकीय सेवांची तयारी करणारे वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी सध्या दिल्लीत अडकुन असल्याने पालकांना चिंता लागल्याने "कलेक्टर साहेब,माझ्या मुलाला घरी आनन्याची व्यवस्था करा हो"अशी आर्त हाक आता हे पालक प्रशासनाकडे करीत असल्याने वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील दिल्लीत अडकुन असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी आनन्यासाठी त्वरीत पाऊल ऊचलावे अशी आशा पालकांमधुन होत आहे.
             महाराष्ट्र शासन  लॉक डाऊन मुळे कोटा येथे अडकलेले मुले परत आणण्याबाबत करीत असलेल्या प्रयत्ना बाबत पालकांमधुन त्यांचे अभिनंदन होत असतांनाच महाराष्ट्रातील हजारो मुले स्पर्धा परीक्षेकरीता दिल्लीत आहेत.त्यामध्ये विषेशतः वाशिम जिल्ह्यातीलही बरेचसे विद्यार्थी दिल्लीला प्रशासकीय सेवेची तयारी करीत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वञ लॉक डाऊन सुरुवातीला  १४ एप्रिल पर्यंत असल्यामुळे चारआठ दिवसात आपल्याला घरी जाता येईल अशा विचाराने ती घरी आली नाही. नंतर लॉक डाऊन वाढल्यामुळे त्यांचे येण्याचे मार्ग बंद झाले. त्यां विद्यार्थ्यांचे आई वडील आता अहोरात्र विचार करीत आहेत.त्यांना झोप सुध्दा येत नाही. शेवटी मुले ही महत्त्वाची असल्याने पालकांना त्यांची चिंता सतावत आहे. मा. पंतप्रधानानी मानसाच्या जीवाला महत्त्व दिले आहे.सध्या बाहेरगावी शिकायला विद्यार्थी अडकुन पडल्यामुळे  सर्वच पालक तणावात आहेत. कारण हा भावनिक मुद्दा आहे. प्रत्येकांना आपलं मुलं प्रिय असुन सर्व राजकीय पुढाऱ्यांनी हे काम प्रथम करावं अशी आशाही व्यक्त केल्या जात आहे.सध्या पालक हा अतिशय काळजीत पडलेला आहे. कोरोनाग्रस्तांची दिल्लीत संख्या जास्त असुन ती दिवसेंदिवस वाढतही आहे.या काळजीने वाशिम जिल्ह्यातील दिल्लीत अडकुन पडलेल्या विद्यार्थ्यांनी घरी आनन्यासाठी वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणी राजकीय पुढारी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment