तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रशासने शहरातील पूर्णाकृती पुतळ्या जवळ साजरी करावी -- किशोर कागदे

आपल्या घरावर रोशनाई व दिवे लावावेत

बीड (प्रतिनिधी) :- दि. १२ सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा वाढलेल्या मुळे सर्व काही बंद आहे, प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी जयंती आपल्या घरात साजरी करावी  सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी येऊ शकत नाही. पण प्रशासनाने बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात अभिवादन करून साजरी करावी, या मध्ये जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक, जि.प.मुख्याधिकारी यांनी जाऊन साजरी करावी. व शासकीय कार्यालयात व शासन स्तरावर  देखिल साजरी केली जावी. सबंध देशभर महाराष्ट्रभर खूप मोठ्या उत्साहात मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरे केले जाते विविध कार्यक्रम व्याख्याने प्रबोधनात्मक कार्यक्रम या सर्व गोष्टीला यावर्षी शासकीय आदेश असल्यामुळे संविधान सन्मान  करत असल्यामुळे करनार नाहीत, साधेपणाने घरातच जयंती साजरी करण्याचं आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जिल्हाध्यक्ष किशोर कागदे यांनी केली आहे. 14 एप्रिल आंबेडकर प्रेमी व  बौध्द अनुयायांनी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर न येतात यावर्षीची जयंती ही साधेपणाने घरात साजरी करावी पण शासन व प्रशासन स्तरावर जयंती प्रत्येक कार्यालयात विभागात शासनाने अधिकाऱ्यांनी साजरी करावी असेही आव्हान किशोर कागदे  यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

No comments:

Post a comment