तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

गरजु गरीब कुटुंबांना दिले जिवनोपयोगी वस्तुंची कीट


बाबासाहेबांच्या जयंतीदिनी गरीबांना दिला आधार

मंगरुळपीर-(फुलचंद भगत)-अवघा महाराष्ट कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना माञ गोर गरीबांचे खुप हाल होत आहे.  अशा गरजु गरजवंताना एक हात मदतीचा मनुन मंगरूळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ  सपकाळ व मित्र मंडळ यांच्याकडून गरीब नागरिकांना धान्य व किराणा किट वाटप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त 14 एप्रिल रोजी करण्यात आले. मंगरूळपीर शहरातील रहिवासी असलेले सौरभ सपकाळ हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहत असून या कोरोना लॉक डाऊन दरम्यान हातावर कमावणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील गरजवंतांना धन्य व किराणा कीटचे वाटप घरोघरी जाऊन केले आहे. हे वाटप करताना त्यांनी गोर गरीबांना व जनतेला प्रशासनाच्या नियमाचे पालन करा,घरीच राहा सुरक्षित राहा,स्वच्छता राखा,गर्दिच्या ठिकानी जायचं नाही आता आपण एकमेकांना सहकार्य करुन कोरोनाला न घाबरता प्रशासनाच्या नियमाचे पालन करुन लढायचे आहे असेही ते संबोधित करत होते. या ऊपक्रमात त्याचे सहकारी मिञ  अरुण खडसे अजय गवारगुरु अक्षय इंगोले निलेश निचळ अमित इंगोले अनुप कांबळे संदीप इंगळे प्रफुल भेंडेकर प्रशांत खर्चे यांच्या हस्ते सदर किटचे वितरण करण्यात आले. या त्यांच्या गरजवंताना मदतीचा एक हात या ऊपक्रमाचे माञ जनतेमधे कौतुक होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment