तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 7 April 2020

खासदार प्रीतमताईंनी घेतली बिहारी मच्छीमार बांधवांना मदत
केज (प्रतिनिधी) :- मांजरा धरणावर मच्छीमारी करणारे ३२ बिहार राज्यातील बिहारी मच्छीमार बांधव हे लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे काम बंद पडल्याने अडकून पडले होते. त्यांनी त्यांच्या भागातील भाजपच्या खासदारांशी संपर्क साधला. मग त्यांनी बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार प्रीतमताई मुंडे यांनी भाजपा तालुका अध्यक्ष केज यांच्याशी संपर्क साधून; त्या परप्रांतीय बांधवाना मदत देण्याचा आदेश देताच तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना सोबत घेऊन धनेगाव गाठले आणि त्यांना अन्नधान्य व किराणा सामान वाटप केले.*


बीड जिल्याह्यातील केज तालुक्यातील मांजरा तलावात मच्छीमारी करणारी ३२ बिहारी मच्छीमार हे मागील काही महिन्या पासून काम करीत आहेत. पण देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झाले. देशात संचारबंदी असल्यामुळे मच्छीमारी देखील बंद झाली. मग या परप्रांतीय मच्छीमारांनी जगायचे कसे? हाताला काम नाही; म्हणून हातात पैसा नाही. आणि मग पैसे नाहीत म्हणून यांची उपासमार सुरू झाली. तसेच हे सर्व परप्रांतीय असल्यामुळे त्यांना गावात कोणी उसनवारी किंवा उधार सामान देत नव्हते. मग उपासमारी सुरू झाल्यास यांच्यातील एकाने आपल्या भागातील एका खासदारांना ही सर्व व्यथा सांगितली. त्या नंतर त्यांनी तात्काळ बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार म्हणून ख्याती असलेल्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्याशी संपर्क साधला. माझ्या बीड जिल्ह्यात परप्रांतीय मच्छीमारांची उपासमार होत असल्याने खा. डॉ. प्रीतमताई मुंडे या हेलावल्या. त्यांनी तात्काळ ही माहिती बीड जिल्ह्या भाजपा अध्यक्ष रमेश पोपळे आणि केज तालुका अध्यक्ष भगवान केदार याना दिली.


भगवान केदार यांनी मग तातडीने या परप्रांतीय मच्छिमार बांधवाना देण्यासाठी सर्व अन्नधान्य व किरणा सामान खरेदी केले. त्यांनी केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांना सोबत घेऊन धनेगाव गाठले. धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर जाऊन या मच्छीमार बांधवाना एक महिना पुरेल एवढे गहू, तांदूळ, आणि सर्व किराणा सामान दिले. आणखीही गरज पडल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान भगवान केदार यांना साळेगाव येथेही महामार्गाच्या पुलाच्या कामावर झारखंड येथील दहा ते बारा मजूर काम करीत असून त्यांचीही उपासमार सुरू असल्याची माहिती पत्रकार गौतम बचुटे यांच्या कडून समजली होती. त्यानाही भगवान केदार यांनी तहसीलदार दुलाजी मेंढके, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, मंडळ अधिकारी भागवत पवार, तलाठी इनामदार व तारळकर, योगेश हंडीबाग, लक्ष्मण सोनवणे व पत्रकार गौतम बचुटे यांच्या उपस्थितीत धान्य देण्यात आले.

भगवान केदार यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.*चौकट/कोट :-*


"हे संकट जगावर ओढवले असून ज्यांच्याकडे जे जे असेल ते त्यांनी संकटात सापडलेल्यासाठी देण्याची गरज आहे आम्ही माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यात मदत करीत आहोत." 

     भगवान केदार
  भाजपा केज तालुका अध्यक्ष

No comments:

Post a comment