तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

लोहारा तालुक्यात कोरोना बद्दल केली जनजागृती


आकाश लश्करे
उस्मानाबाद

स्वयं शिक्षण प्रयोग ही गेल्या पंचवीस वर्षापासून देशातिल सात राज्यामधे शास्वत शेती महिला सक्षमीकरण आणि महिला व्यवसायिकता याबद्दल काम करते यामध्ये स्वयं शिक्षण प्रयोग संस्थापक प्रेमाताई गोपालन डायरेक्टर उपमन्यु पाटील व प्रोग्राम डायरेक्टर मोमीन तबसुम यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद  जिल्ह्यात काम करते उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात बत्तीस गावांमध्ये कृषी संवाद सहाय्यक काम करीत आहेत. स्वयम् शिक्षण प्रयोग च्या वतीने विविध उपक्रम सेंद्रिय शेती व्यवसायिक उभारणी विविध विषयावर प्रशिक्षण यामध्ये आत्मा, पोखरा कृषी विभागाकडून महिलांना विविध तळागाळातील महिलांना रोजगार महिलांच्या नावाने शेती विविध कामे केली जातात सध्या कोरोनामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे लोकांमध्ये भीतीचे वातावरण  पसरले आहे रोजगार करून स्वतःचे घर सांभाळून कुटुंब काय खावे व काय करावे याचा प्रश्न उद्भवत आहे ही परिस्थिती सर्व जगात झाली आहे आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून गरजू लोकांसाठी स्वयं शिक्षण प्रयोग याच्या कृषी संवाद सहाय्यक प्रत्येक गावात जनजागृतीचे काम करत आहेत प्रत्येक गावात कोरोणाबद्दल जनजागृती २० सेकंद हात धुण्याचे डेमो स्टेशन स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे  याची माहिती सांगत आहेत तसेच गावांमध्ये लोकांकडून जे सामान वाटप होत आहे  गरजू कुटुंबाला भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेतआहेत़़..........आष्टाकासर या गावांमधील स्वयं शिक्षण प्रयोगाची गावपातळीवर काम करण्याचे कृषी संवाद सहाय्यक यांनी मीना माळी यांची व्यवसाय भाजीपाला मिरची कांडप असे व्यवसाय आहेत या कोरोना रोगाबद्दल माहिती दिली यांच्या शेतातील निघालेल्या भाजीपाला गवार भेंडी पालक कांदे कारले  मेथी लाल मिरची पावडर इत्यादी विधवा अपंग अतिशय गरीब परित्यक्ता अशा 35 कुटुंबांना वाटण्यात आली व इतर कुटुंबांना तीन महिने उधारी व भाजीपाला व लाल मिरची पावडर देण्यात आले अशी माहिती स्वयं शिक्षण प्रयोग तालुका समन्वय अंकिता पाटील यांनी सांगितले आहे

No comments:

Post a Comment