तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

*भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहात साजरी

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

केलसूला येथे  जयंती सोहळा साजरा करणे शक्‍य नाही. घरी राहूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन ग्रामपंचायत केलसूला याच्या कडून देण्यात आले आहें 
देशावर ओढवलेली परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. अशावेळी "मी प्रथम भारतीय व अंतिमत: भारतीय' माणणाऱ्या या भारतरत्नाचे अनुयायी ही जयंती नेहमीप्रमाणे उत्साही स्वरूपात साजरी करणार नाही, हे आता निश्‍चित झाले आहे. मात्र, डीजिटल माध्यमाचा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना समाजबांधवांनी शोधली आहे. बाहेर पडण्याऐवजी घरातूनच डीजिटल माध्यमातून महामानवांच्या विचारांचा जागर केला  आहे.
विश्वरत्न ,युगप्रवर्तक ,प्रज्ञासूर्य ,क्रांतिसुर्य, ज्ञानाचा अथांग सागर बोधिसत्व व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती  ही डिजिटल स्वरुपात साजरी करण्यात येत आहे. 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे आदर्शवत असुन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाच्या तळागाळातील माणसाचा विकास होण्यासाठी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला बाबासाहेबांचे कार्य हे सर्व समाजासाठी होते. या देशातील करोडो बहुजनांच्या आयुष्याचे सोने मात्र विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने झाले केलसूला येथे बाबा साहेबांना अभिवादन करण्यात आले या वेळी उपस्थिती सरपंच विनोद खनके विलास नेव्हल परमेश्वर सासते जनार्धन खोडके दामू वाकले अशोक इंगळे संतोष काळे नवनाथ काळे यांनी ड्रॉ .बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व नंतरग्रामपंचायत कडून  पूर्ण गावात सनीटाईजर वाटप करण्यात आले 
तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment