तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने गरजूंना धान्य वाटपऔरंगाबाद (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे गरीब , गरजू व  हातावर पोट असलेल्या नागरिकांना काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले, लॉकडाऊन व कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन कामगार व गरीब यांना उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ.नितीनजी राऊत यांच्या आदेशानुसार व  डॉ.अरुण शिरसाट शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या अनुसूचित जातीच्या वतीने भीमनगर, भावसिंगपुरा येथील गरजूंना धान्यवाटप  करण्यात आले यामध्ये त्यांना गहू, तांदूळ, तेल, डाळ इत्यादी जीवनवश्यक वस्तूंचा समावेश होता,या प्रसंगी औरंगाबाद शहर कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष  डॉ. अरुण शिरसाट ,प्रा.शिलवंत गोपणारायन व कार्यकर्ते उपस्थित होते.अमर हिवराळे यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment